शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जून २०१९ मध्ये  नागपुरातील  हिंगणा मार्गावर धावणार मेट्रो 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:42 IST

महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गतचे विकास कार्य निश्चित वेळेत पूर्ण होत आहे. याच शृंखलेत मुंजे चौक ते लोकमान्यनगरपर्यंत रिच-३ चे काम वेगात पूर्ण करण्यात येत असून ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. जून २०१९ पर्यंत ट्रायल रन सुरू होणार असल्याचा विश्वास महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देसिग्नलिंग रूमचे दीक्षित यांच्या हस्ते उद्घाटन 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गतचे विकास कार्य निश्चित वेळेत पूर्ण होत आहे. याच शृंखलेत मुंजे चौक ते लोकमान्यनगरपर्यंत रिच-३ चे काम वेगात पूर्ण करण्यात येत असून ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. जून २०१९ पर्यंत ट्रायल रन सुरू होणार असल्याचा विश्वास महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी व्यक्त केला.हिंगणा मेट्रो मार्गावर सुभाषनगर स्टेशनवर टेलिकॉम इक्विपमेंट रूम (टीईआर), सिग्नलिंग इक्विपमेंट रूम (एसईआर), यूपीएस बॅटरी रूम, अ‍ॅन्सिलरी सबस्टेशन उपकेंद्र (एएसएस), भूमिगत वॉटर टँक आणि पंप केंद्र कक्षाचे उद्घाटन दीक्षित यांच्या हस्ते मंगळवारी झाले.दीक्षित म्हणाले, सहा महिन्यात सुभाषनगर स्टेशनचे काम पूर्ण होताच ट्रायल रनवर भर राहणार आहे. अंबाझरी तलावाचा किनारा असल्यामुळे हे क्षेत्र प्रवाशांसोबत पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. रिच-३ मधील स्टेशन थीमच्या धर्तीवर उभारण्यात येणार आहे.सुभाषनगर आणि अंबाझरी मेट्रो स्टेशनदरम्यान जवळपास एक कि़मी.ची गॅलरी राहील. आठ मीटर रुंद प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूला काच लावण्यात येणार आहे. ते पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. दीक्षित म्हणाले, विश्वस्तरीय गुणवत्तेच्या स्टेशनच्या उभारणीसह गुणवत्तेवर लक्ष देण्यात येत आहे. देशविदेशातील नऊ कंपन्या कार्यरत आहेत. एक वर्षाच्या परिश्रमानंतर सुभाषनगर स्टेशन प्रवासी आणि तंत्रज्ञानाच्या सर्व पैलूंवर साकार झाले आहे. बांधकाम पूर्ण होताच एक रॅक हिंगणा मार्गवर ट्रायलकरिता आणण्यात येईल. एका प्रश्नाच्या उत्तरात दीक्षित म्हणाले, एअरपोर्ट प्राधिकरणांच्या नियमांचे पालन करण्यात आले आहे. महामेट्रोला स्पेशल प्लॅनिंग अ‍ॅथॉरिटीचा दर्जा मिळाल्यामुळे कार्य सुरळीत झाले आहे.प्रारंभी दीक्षित यांनी विधिवत पूजा करून कक्षाचे उद्घाटन केले. यावेळी महामेट्रोचे प्रकल्प संचालक महेश कुमार, रोलिंग स्टॉक संचालक निदेशक सुनील माथूर, वित्त संचालक एस. शिवमाथन, महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर