सीताबर्डी येथील जुन्या पुस्तक विक्रेत्यांना मेट्रोने जागा द्यावी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:09 IST2021-09-21T04:09:20+5:302021-09-21T04:09:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सीताबर्डी येथील वर्षानुवर्ष जुनी पुस्तके विकणाऱ्या दुकानदारांना मेट्रोने जागा उपलब्ध करून द्यावी. मेट्रोची ...

Metro should provide space for old booksellers at Sitabardi () | सीताबर्डी येथील जुन्या पुस्तक विक्रेत्यांना मेट्रोने जागा द्यावी ()

सीताबर्डी येथील जुन्या पुस्तक विक्रेत्यांना मेट्रोने जागा द्यावी ()

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सीताबर्डी येथील वर्षानुवर्ष जुनी पुस्तके विकणाऱ्या दुकानदारांना मेट्रोने जागा उपलब्ध करून द्यावी. मेट्रोची २० मजली इमारत फ्रीडम पार्क येथे होणार आहे. त्यात जुन्या पुस्तक विक्रेत्यांना दहा बाय दहा किंवा आठ बाय दहा अशा स्वरूपात पर्यायी जागेची व्यवस्था करावी, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी दिले. पुढील पंधरा दिवसानंतर या विषयाचा पुन्हा आढावा घेण्यात येईल, असेही स्पष्ट केले.

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना तसेच विविध क्षेत्रातील संशोधक व अभ्यासक मोठ्या प्रमाणावर जुनी पुस्तके विकत घेतात. अनेक वर्षांपासून हे पुस्तक विक्रेते करीत असलेल्या व्यवसायाचे नुकसान होणार नाही, यादृष्टीने प्रयत्न करावे, असे राऊत यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पुस्तक विक्रेत्यांच्या अडचणीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी विमला आर., महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्थचे अध्यक्ष नरेश वाहाणे, मेट्रोचे कार्यकारी संचालक प्रशासन अनिल कोकाटे उपस्थित होते.

Web Title: Metro should provide space for old booksellers at Sitabardi ()