शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वे हिंगणा मार्गावरही धावण्याकरिता सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 22:37 IST

नागपूर मेट्रोच्या रिच-३ (सीताबर्डी ते लोकमान्य नगर) अ‍ॅक्वा लाईनवर सीबीटीसीने ताशी ८० किमी वेगाने मेट्रोची प्रवासी सेवा सुरु करण्यासाठी महा मेट्रो सज्ज आहे.

ठळक मुद्देमेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी केली हिंगणा मार्गाची पाहणीसीबीटीसी, विविध यंत्रणाचे सीएमआरएसतर्फे परीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरमेट्रोच्या रिच-३ (सीताबर्डी ते लोकमान्य नगर) अ‍ॅक्वा लाईनवर सीबीटीसीने ताशी ८० किमी वेगाने मेट्रोची प्रवासी सेवा सुरु करण्यासाठी महा मेट्रो सज्ज आहे. या मार्गावर प्रवासी सेवेच्या दृष्टीने सर्व आवश्यक कार्य आणि ५ स्टेशनचे कार्य देखील महा मेट्रोने पूर्ण केले आहे.नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या हिंगणा मार्गावरील (रिच ३ अ‍ॅक्वा लाईन) कार्याचे परीक्षण करण्यासाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) जनक कुमार गर्ग आणि पथक सोमवारी नागपूरला पोहचले. गर्ग यांनी या दौऱ्यात हिंगणा मार्गावर ट्रॉलीच्या साहाय्याने ट्रॅक व ओएचई व इतर आवश्यक बाबींची पाहणी केली यात प्रामुख्याने कम्युनिनिकेशन बेस्ड सिग्नलिंग आणि ट्रेन कंट्रोल सिस्टमच्या (सीबीटीसी),आटोमेटीक ट्रेन प्रोटेक्शन, ऑटोमेटीक ट्रेन सुपरविजनचे परीक्षण करण्यात आले. वेगवेगळ्या टप्यामध्ये हे निरीक्षण होत असून त्याच अंतर्गत आज हे निरीक्षण करण्यात आले. सीताबर्डी ते लोकमान्य नगर दरम्यान मेट्रोची प्रवासी सेवा सुरु झाल्याने मोठ्या प्रमाणात येथील रहिवाश्याना त्याचा फायदा होणार आहे. याशिवाय या मार्गावर असलेल्या मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल, शाळा/महाविद्यालय आणि व्यावसायिक दुकानांमध्ये येणाऱ्यांसाठी मेट्रो सेवा उपयुक्त ठरणार आहे.रिच-३ लोकमान्य नगर ते सीताबर्डी इंटरचेंज अश्या ११ कि.मी.अंतराचे प्रवास प्रवाश्यांना आनंददायी ठरणार आहे. रिच- ३ आणि रिच- ४ या मार्गिकेला अ‍ॅक्वा लाईन असे नाव देण्यात आले असून नैसर्गिक सौंदर्याचा प्रवास या मार्गिकेवर बघायला मिळणार आहे. अ‍ॅक्वा लाईन मार्गिकेचा प्लॅटफॉर्म सीताबर्डी इंटरचेंज येथील तिसऱ्या माळ्यावर राहणार आहे. सदर मार्गावर झासी राणी चौक, इंस्टीट्युट ऑफ इंजिनियर्स, सुभाष नगर आणि लोकमान्य नगर मेट्रो स्थानकांचे निर्माण कार्य पूर्ण झाले आहे.या पाहणी दरम्यान संचालक (प्रकल्प) महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथुर, कार्यकारी संचालक (रिच-३) अरुण कुमार, कार्यकारी संंचालक (ट्रॅक) नरेश गुरबानी, कार्यकारी संचालक (ओएचई) गिरधारी पौनीकर, कार्यकारी संचालक (सिग्नलिंग) डेहरीया, कार्यकारी संचालक(ईलेव्कट्रीकल) राजेश पाटील, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (रोलिंग स्टॉक) राजेश कुमार पटेल, महाव्यवस्थापक (ओ अँड एम) सुधाकर उराडे, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (ओएचई) नामदेव रबडे आदीउपस्थित होते.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर