शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

नागपुरात मेट्रो पिलरच्या सळाखींचा ढाचा झुकला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 21:28 IST

मुंजे चौकातून जानकी टॉकीजकडे जाणाऱ्या मार्गावर मेट्रो रेल्वेच्या बांधकामादरम्यान मेट्रो पिलरच्या सळाखींचा ढाचा रस्त्यावर झुकल्यामुळे नागरिकांमध्ये काहीकाळ भीतीचे वातावरण पसरले होते. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी तातडीने रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविली आणि सळाखी उभ्या केल्या. ही घटना सायंकाळी ६ च्या सुमारास घडली.

ठळक मुद्देमेट्रो चौकातील घटना : वाहतूक अन्य मार्गाने वळविली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंजे चौकातून जानकी टॉकीजकडे जाणाऱ्या मार्गावर मेट्रो रेल्वेच्या बांधकामादरम्यान मेट्रो पिलरच्या सळाखींचा ढाचा रस्त्यावर झुकल्यामुळे नागरिकांमध्ये काहीकाळ भीतीचे वातावरण पसरले होते. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी तातडीने रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविली आणि सळाखी उभ्या केल्या. ही घटना सायंकाळी ६ च्या सुमारास घडली.मेट्रो रेल्वेच्या पूर्व-पश्चिम मार्गावर मुंजे चौकात बहुमजली इंटरचेंज स्टेशनचे बांधकाम सुरू आहे. त्याकरिता पिलर उभारणीसाठी सळाखींची जोडणी करण्याचे काम सुरू होते. पण या सळाखींना एक बाजूला आधार नव्हता. त्यामुळे सळाखींचा तोल एका बाजूला गेला होता. याची सूचना एका नागरिकाने मेट्रोच्या नियंत्रण कक्षाला दिली. याची गंभीर दखल घेत महामेट्रोचे कार्यकारी संचालक देवेंद्र रामटेककर यांच्या नेतृत्वातील अधिकाऱ्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हायड्रोलिक क्रेनच्या सहाय्याने या सळाखींना आधार देण्यात आला. सुरक्षेच्या कारणांनी या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली. घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.सहा महिन्यांपूर्वी याच मार्गावर पिलरच्या सळाखींचा ढाचा आधाराअभावी रस्त्यावर कोसळला होता. त्यावेळी सुदैवाने कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. त्या तुलनेत यावेळी ढाचा अल्पसा वाकला होता. बांधकामादरम्यान सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Metroमेट्रोAccidentअपघात