शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात लोकप्रतिनिधींनी अनुभवली मेट्रो सफर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:43 IST

नागपूर मेट्रोतर्फे राबविल्या जाणाऱ्या जॉय राईड संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव लोकप्रतिनिधींनी घ्यावा म्हणून शनिवारी खास लोकप्रतिनिधींकरिता ‘सेरिमोनियल राईड’चे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देसेरिमोनियल राईड : पालकमंत्र्यांसह जि.प. अध्यक्ष व आमदारांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर मेट्रोतर्फे राबविल्या जाणाऱ्या जॉय राईड संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव लोकप्रतिनिधींनी घ्यावा म्हणून शनिवारी खास लोकप्रतिनिधींकरिता ‘सेरिमोनियल राईड’चे आयोजन करण्यात आले होते.यात जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, आ. सुधाकरराव देशमुख, डॉ.मिलिंद माने, आ. समीर मेघे, आ. आशिष देशमुख, आ. जोगेंद्र कवाडे, आ. अनिल सोले, जि.प. सदस्य रुपराव शिंगणे, पंचायत समिती सदस्य रेखा मसराम, खापरी ग्रामपंचायतच्या सरपंच पार्वताबाई आत्राम, उपसरपंच सेवकराम सोनटक्के तसेच, ग्रामपंचायत सदस्य नितीन लोखंडे, ओमप्रकाश तेलरांधे, सचिन वानखेडे, प्रभाकर जुमडे, सिंधूबाई झाडे, बेबीबाई धुर्वे, प्रियतमा वाघाडे, लताबाई गवई आणि लक्ष्मीबाई मसराम आदी सहभागी झाले होते.एअरपोर्ट (साऊथ) स्टेशन येथून जॉय राईडला सुरुवात झाली. या मार्गावरील न्यू एअरपोर्ट आणि खापरी स्टेशनचा हा पूर्ण दौरा महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत केला. यावेळी एअरपोर्ट (साऊथ) स्टेशन येथे पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष तिकीट काढून तिकीट विक्री व्यवस्था जाणून घेतली. तसेच स्थानकांवर दिव्यांगांकरिता असलेल्या सोईची माहिती जाणून घेतली. खापरी स्टेशन येथे कंट्रोलिंग सिस्टीम, सीसीटीव्ही सर्व्हिलन्स, सोलर सिस्टीम, इमर्जंसी दूरध्वनी सेवा, सब-वे येथील आर्ट वर्क, मुख्य गेट आर्किटेक्चर तसेच न्यू एअरपोर्ट स्टेशन येथील भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.राईड संपल्यावर लोकप्रतिनिधींकरिता विविध विषयांवर सादरीकरण करण्यात आले.यावेळी संचालक (प्रकल्प) महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथुर, संचालक (वित्त) एस. शिवमाथान उपस्थित होते.मेट्रो प्रवास पर्यटनासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदूमहामेट्रोच्या कोचेसमधून होणारा प्रवास हा येत्या काळात पर्यटनाकरिता आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल असा विश्वास यावेळी आमदारांनी व्यक्त केला.

टॅग्स :Metroमेट्रोrailwayरेल्वे