सायक्लोथॉनद्वारे प्रदूषणमुक्त व पर्यावरण संवर्धनाचा संदेश ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:58 IST2021-02-05T04:58:52+5:302021-02-05T04:58:52+5:30
क्षेत्रीय व्यवस्थापक महेश जंगम आणि जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन झाले. याप्रसंगी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे ...

सायक्लोथॉनद्वारे प्रदूषणमुक्त व पर्यावरण संवर्धनाचा संदेश ()
क्षेत्रीय व्यवस्थापक महेश जंगम आणि जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन झाले. याप्रसंगी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे वितरक, डिलिव्हरी बॉय, पेट्रोल पंपचे वितरक रॅलीमध्ये भौतिक अंतर ठेवून आणि कोरोना नियमांचे पालन करीत सहभागी झाले. जंगम यांनी सक्षम या प्रदूषण नियंत्रणाच्या उपक्रमाविषयी माहिती दिली आणि सायकल रॅली हा त्याचाच भाग असल्याचे सांगितले. रॅली लेडिज क्लब चौक, अहिंसा चौक, आकाशवाणी चौकमार्गे बीपीसीएल कार्यालयात परतली.
सायकल चालविल्यामुळे आरोग्य उत्तम राहते आणि इंधनाची बचत होते. सोबतच प्रदूषण नियंत्रणाला सहकार्य मिळते. दैनंदिन जीवनात सायकलचा वापर करून प्रदूषण नियंत्रणास मदत करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात केले होते. यानुसार दरवर्षी सक्षम सायकल सायक्लोथॉनचे आयोजन देशभरात ३०० शहरात विविध पेट्रोलियम कंपन्यांतर्फे करण्यात येते.