सायकल रॅलीतून चिअर फॉर इंडियाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:06 IST2021-07-24T04:06:44+5:302021-07-24T04:06:44+5:30

नागपूर : टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत यंदा भारतीय खेळाडूंकडून देशाला खूप अपेक्षा आहेत. भारतीय खेळाडूंचे मनोबल वाढविण्यासाठी ...

Message of Cheer for India from Cycle Rally | सायकल रॅलीतून चिअर फॉर इंडियाचा संदेश

सायकल रॅलीतून चिअर फॉर इंडियाचा संदेश

नागपूर : टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत यंदा भारतीय खेळाडूंकडून देशाला खूप अपेक्षा आहेत. भारतीय खेळाडूंचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच शुभेच्छा देण्यासाठी प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, नेहरू युवा केंद्र व जेडी स्पोर्टस यूथ फाऊंडेशनच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

क्रीडा चौकातून रॅलीला सुरुवात झाली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय नागपूर विभागाचे उपसंचालक शेखर पाटील यांच्‍या हस्‍ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

यावेळी अर्जुन तसेच द्रोणाचार्य पुरस्कार विजेते विजय मुनिश्‍वर, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवक विकास अधिकारी उदय धिर , ईश्‍वर देशमुख कॉलेजच्या प्राचार्य शारदा नायडू, ईश्‍वर देशमुख शा. शि.महाविद्यालयाचे प्रा. संभाजी भोसले, डॉ. जयप्रकाश दुबळे, डॉ. केशव भगत, माजी प्राचार्य,संजय तिवारी उपस्थित होते. जयंत दुबळे यांनी संचालन केले.

Web Title: Message of Cheer for India from Cycle Rally