पारा घसरला, थंडी वाढली

By Admin | Updated: December 25, 2016 03:04 IST2016-12-25T03:04:41+5:302016-12-25T03:04:41+5:30

नागपुरात थंडीचा जोर कायम आहे. शनिवारी किमान तापमानात सरासरीपेक्षा चार अंशाची घट झाली.

The mercury dropped, the cold grew | पारा घसरला, थंडी वाढली

पारा घसरला, थंडी वाढली

नागपुरात किमान तापमान ८.५ अंशावर
नागपूर : नागपुरात थंडीचा जोर कायम आहे. शनिवारी किमान तापमानात सरासरीपेक्षा चार अंशाची घट झाली. पारा ८.५ अंशांपर्यंत खाली पोहचला. गोंदियात थंडीची लाट कायम असून येथे पारा ७.७ अंशापर्यंत खाली घसरला आहे. येत्या दिवसात आणखी थंडी वाढण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार हवा उत्तर-पश्चिमकडून दक्षिण-पश्चिमकडे वाहत आहे. हवेचा वेग मंदावला असल्यामुळे पारा ८ ते ११ अंशादरम्यान स्थिरावला आहे. हवेची गती वाढली तर पारा आणखी घसरू शकतो. त्यामुळे डिसेंबरच्या शेवटी आणखी थंडी वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी दिवसभर ऊन निघाले. अकोला येथे ९.६, वर्धा व चंद्रपूरमध्ये १०, ब्रह्मपुरी १०.७, अमरावती येथे १०.८, यवतमाळ येथे ११, बुलडाणा येथे १२.५, वाशिम येथे १५.८ अंश सेल्सियस तापमान नोंद करण्यात आली. (प्रतिनिधी)

डिसेंबरच्या शेवटी थंडी वाढणार
डिसेंबरच्या शेवटी थंडीचा जोर वाढत असल्याचा अनुभव आहे. गेल्या दहा वर्षात २५ डिसेंबरनंतरच सर्वाधिक थंडीची नोंद झाली आहे. यावर्षीही डिसेंबरच्या शेवटी थंडी वाढण्याची शक्यता आहे. या वर्षी १९ डिसेंबर रोजी पारा ७.८ अंशापर्यंत खाली घसरला असून या मोसमातील आजवरचा हा सर्वात थंड दिवस राहिला आहे.
थंडीने गारठून वृद्धाचा मृत्यू ?
शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास सक्करदरा उड्डाण पुलाखाली एका अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला. कडाक्याच्या थंडीमुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय आहे. राकेश बबनराव निकम (वय २९, रा. खरबी) यांनी दिलेल्या सूचनेवरून सक्करदरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहे.

Web Title: The mercury dropped, the cold grew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.