एलबीटी भरण्यासाठी व्यापाऱ्यांची गर्दी

By Admin | Updated: June 29, 2014 00:41 IST2014-06-29T00:41:12+5:302014-06-29T00:41:12+5:30

वर्षभर स्थानिक स्वराज्य संस्था कर(एलबीटी) भरण्यास टाळाटाळ करणारे व्यापारी कारवाईच्या धास्तीने एलबीटी भरण्यासाठी पुढे सरसावले आहे. शनिवारी एकाच दिवशी २५०० व्यापाऱ्यांनी व्यवसायाचे

Merchants' crowd to fill the LBT | एलबीटी भरण्यासाठी व्यापाऱ्यांची गर्दी

एलबीटी भरण्यासाठी व्यापाऱ्यांची गर्दी

महापालिका : शनिवारी २५०० व्यापाऱ्यांनी माहिती सादर केली
नागपूर : वर्षभर स्थानिक स्वराज्य संस्था कर(एलबीटी) भरण्यास टाळाटाळ करणारे व्यापारी कारवाईच्या धास्तीने एलबीटी भरण्यासाठी पुढे सरसावले आहे. शनिवारी एकाच दिवशी २५०० व्यापाऱ्यांनी व्यवसायाचे रिटर्न सादर केले. शहरातील ३०००० व्यापाऱ्यांनी रिटर्न सादर करणे अपेक्षित आहे. परंतु २८ जूनपर्यत ६००० व्यापाऱ्यांनी रिटर्न सादर केले आहे. यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. रिटर्न भरण्यासाठी व्यापाऱ्यांनी आयुक्ताकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. परंतु नियमानुसार मुदतवाढ देणे शक्य नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. एलबीटी रिटर्न न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर मनपा अधिनियम १९४९ च्या कलम १५२ नुसार कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
आयुक्तांनी कारवाईचा इशारा दिल्याने व्यापारी धास्तावले आहे. शनिवारी सुटीचा दिवस असूनही मनपाचा एलबीटी विभाग सुरू होता. झोन कार्यालयातही रिटर्न भरण्याची सुविधा केली आहे. रविवारी ही कार्यालये सुरू राहणार आहे.
३० जूनपर्यंतच रिटर्न भरण्याची मुदत असल्याने सुटीच्या दिवसात कार्यालय सुरू ठेवण्यात आल्याची माहिती एलबीटी विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली. जे व्यापारी रिटर्न भरणार नाही. त्यांचेवर नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा मेश्राम यांनी दिला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Merchants' crowd to fill the LBT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.