शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी पोलिसांसोबत काम करण्यास तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 00:00 IST

कोरोना महामारीमुळे नागपुरात उद्भवलेल्या सामाजिक व आर्थिक संकटात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे. याकरिता व्यापारी पोलिसांना सहकार्य करण्यास तयार असल्याचे मत चेंबर ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अ‍ॅण्ड ट्रेडचे (कॅमिट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ठळक मुद्देकॅमिटचे पोलीस आयुक्तांना निवेदन : कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना महामारीमुळे नागपुरात उद्भवलेल्या सामाजिक व आर्थिक संकटात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे. याकरिता व्यापारी पोलिसांना सहकार्य करण्यास तयार असल्याचे मत चेंबर ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अ‍ॅण्ड ट्रेडचे (कॅमिट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यांनी व्यावसायिकांतर्फे आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.अग्रवाल म्हणाले, नागपुरात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी व्यापाऱ्यांचे पोलिसांना सहकार्य राहणार आहे. कोरोनामुळे सध्या शहराच्या सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेला छेद गेला आहे. भविष्यात आवश्यक पावले उचलण्याची गरज आहे. नागपुरात दरदिवशी कोरोनाची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. अशा स्थितीत अधिकाऱ्यांतर्फे नागरिकांसोबत सौहार्दपूर्ण व्यवहार करावा. अग्रवाल म्हणाले, वर्ष २००५ मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्तांनी पोलीस मित्र समितीची स्थापना केली होती. समितीची नियमित बैठक व्हायची. पोलीस आयुक्त थेट संपर्कात राहायचे आणि सूचना द्यायचे. आता कोरोना महामारीविरुद्ध लढण्यात पोलिसांना सहकार्य करण्यासाठी अशा समितीची गरज आहे. पोलीस आयुक्तांनी पोलीस मित्र समितीची स्थापना करावी.अमितेश कुमार यांनी स्वागताचा स्वीकार करीत कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले. व्यापारी आणि नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी कठोर निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. याप्रसंगी धीरज मालू यांनी पोलीस आयुक्तांचे आभार मानले आणि संकटसमयी व्यापाºयांतर्फे महामारीवर नियंत्रणासाठी पोलिसांसोबत मिळून काम करू, असे आश्वासन दिले. यावेळी संजय के .अग्रवाल उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याpolice commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालयbusinessव्यवसाय