मनाेरुग्णाने टायर जाळून केला रास्ता राेकाे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:07 IST2021-06-23T04:07:19+5:302021-06-23T04:07:19+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : शहरातील राेडने फिरणाऱ्या एका मनाेरुग्ण तरुणाने मंगळवारी (दि. २२) सकाळी ६ वाजताच्या सुमारास कहर ...

The mentally ill person burned the tires and blocked the road | मनाेरुग्णाने टायर जाळून केला रास्ता राेकाे

मनाेरुग्णाने टायर जाळून केला रास्ता राेकाे

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : शहरातील राेडने फिरणाऱ्या एका मनाेरुग्ण तरुणाने मंगळवारी (दि. २२) सकाळी ६ वाजताच्या सुमारास कहर केला. त्याने शहरातील बसस्थानक चाैकात राेडवर चक्क टायर जाळून रास्ता राेकाे केला. एवढेच नव्हे तर त्याने वाहनांवर दगडफेक केल्याने नागरिकांमध्ये काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

शेख फईम मोहम्मद अलीम शेख (२५, रा. हरदासनगर, कामठी) अटक करण्यात आलेल्या मनाेरुग्णाचे नाव आहे. ताे मंगळवारी सकाळी फिरत शहरातील बसस्थानक चाैकात आला. त्याने तिथे राेडच्या मध्यभागी टायर जाळला. त्यामुळे नागपूर-कामठी-कन्हान मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली हाेती.

त्याचा हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही. त्याने चक्क वाहनांसह नागरिकांच्या दिशेने दगडफेक करायला सुरुवात केली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यातच काहींनी या प्रकाराची माहिती पाेलिसांना दिली. पाेलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून शिताफीने त्याला ताब्यात अटक केली. त्यानंतर टायर विझवून वाहतूक सुरळीत केली. त्याची नागपूर शहरातील मेयाे रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्याला मनाेरुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती कामठी (जुनी)चे ठाणेदार राहुल सिरे यांनी दिली.

Web Title: The mentally ill person burned the tires and blocked the road