धनगर समाज कर्मचाऱ्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:10 IST2021-02-16T04:10:19+5:302021-02-16T04:10:19+5:30

सावनेर : धनगर समाज अधिकारी, कर्मचारी संघटना शाखा नागपूरच्या वतीने सावनेर येथील राम गणेश गडकरी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात ...

Meeting of Dhangar Samaj employees | धनगर समाज कर्मचाऱ्यांची बैठक

धनगर समाज कर्मचाऱ्यांची बैठक

सावनेर : धनगर समाज अधिकारी, कर्मचारी संघटना शाखा नागपूरच्या वतीने सावनेर येथील राम गणेश गडकरी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात तालुक्यातील कर्मचारी बांधवांची बैठक आणि संवाद कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिलकुमार ढोले हाेते. प्रमुख अतिथी म्हणून राज्य उपाध्यक्ष विलास डाखोळे, जिल्हा अध्यक्ष धर्मेंद्र बुधे, उपाध्यक्ष विजय टेकाडे आदी होते. यावेळी अनिलकुमार ढोले यांनी संघटनेची गरज आणि आवश्यकता सांगत, कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विलास डाखोळे यांनी धनगर समाजातील कर्मचारी बांधवांवरील अन्यायाबाबत परखड मत मांडून रोष व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र बुधे यांनी संघटनेची जिल्ह्यातील वाटचाल वेगाने सुरू असून, या संघटनेच्या रोपट्याचे लवकरच वटवृक्षात रूपांतर होईल, असा विश्वास व्यक्त केला. सूत्रसंचालन प्रा.विजय टेकाडे यांनी केले. शरद नांदूरकर यांनी आभार मानले. बैठकीला प्रा.बाबा टेकाडे, मधुसूदन ढोले, श्रावण गोहत्रे, श्याम ढोले, चंद्रकांत टेकाडे, प्रफुल्ल वडे, अनिल टेकाडे, अरविंद डहाके, प्रमोद डाखोळे, महेश डहाके, नंदू टेकाडे, दाैलत डहाके आदींसह तालुक्यातील कर्मचारी उपस्थित हाेते.

Web Title: Meeting of Dhangar Samaj employees