स्वतंत्र राज्यांच्या मागणीसाठी राष्ट्रपतींना भेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:51 IST2017-10-16T00:51:25+5:302017-10-16T00:51:34+5:30

विदर्भासह बोडोलॅण्ड, बुंदेलखंड, , पूर्वांचल, कुकीलॅण्ड आदी स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी नवराज्य निर्माण महासंघ आता दिल्लीत दबाव निर्माण करणर आहे.

Meet the President for the demand of independent states | स्वतंत्र राज्यांच्या मागणीसाठी राष्ट्रपतींना भेटणार

स्वतंत्र राज्यांच्या मागणीसाठी राष्ट्रपतींना भेटणार

ठळक मुद्देनवराज्य निर्माण महासंघ : दिल्लीत कायमस्वरूपी कार्यालय उघडणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भासह बोडोलॅण्ड, बुंदेलखंड, , पूर्वांचल, कुकीलॅण्ड आदी स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी नवराज्य निर्माण महासंघ आता दिल्लीत दबाव निर्माण करणर आहे. यासाठी दिल्लीमध्ये महासंघाचे एक कायमस्वरूपी कार्यालय उघडण्यात येईल तसेच एक शिष्टमंडळ राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना दिल्लीत भेटून निवेदन सादर करतील. यासाठी येत्या २६ आॅक्टोबर रोजीची वेळ मागण्यात आली आहे.
नवराज्य निर्माण महासंघाचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन रविवारी पार पडले. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. श्रीहरी अणे, कार्यकारी अध्यक्ष राजा बुंदेला, अ‍ॅड. रवी सन्याल, अ‍ॅड. नीरज खांदेवाले आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अनेक ठराव मंजूर करण्यात आले. संघटनात्मक आणि राजकीय ठरावांचा समावेश होता. नवराज्य निर्माण महासंघातर्फे आता दिल्लीत आपला दबाव निर्माण करण्यासाठी दिल्लीत कायमस्वरूपी कार्यालय उघडण्यात येईल. याचा खर्च सर्व सदस्य समानपणे उचलतील. कार्यकारी समिती तयार केली जाईल. महासंघाचे ई-मेल अकाऊंट आणि फेसबुक पेज तयार केले जाईल. नवीन राज्यांबाबत दिल्लीत चर्चासत्र व वादविवादाचे कार्यक्रम घेतले जातील. नवीन राज्य तयार करण्याबाबत केंद्र सरकारशी सातत्याने चर्चा केली जाईल. नवीन राज्याबाबत सरकारचे धोरण काय आहे. त्यासंदर्भात सुरू असलेली कारवाई याबाबत विचारणा केली जाईल. असे ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी गोरखालॅण्डसाठी सुरूअसलेल्या आंदोलनाबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी पूर्वांचल अ‍ॅक्शन ग्रुपचे पंकज कुमार जायस्वाल, आॅल बोडो स्टुडंट युनियनचे अध्यक्ष प्रमोद बोरो, पीपल्स जॉर्इंट अ‍ॅक्शन कमिटी फॉर बोडोलॅण्ड मुव्हमेंटचे मुख्य संयोजक राकेश बोरो, नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट आॅफ बोडोलॅण्ड (प्रोग्रेसिव्ह) आदी प्रामुख्याने उपस्थित होते. रवी सन्याल नवराज्य निर्माण महासंघाचे सचिव व प्रवक्ते
विदर्भ राज्य आघाडीचे कार्यकारी अध्यक्ष अ‍ॅड. रवी सन्याल यांना नॅशनल फेडरेशन आॅफ न्यू स्टेट्स (नवराज्य निर्माण महासंघाचे) राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते म्हणून यावेळी नियुक्त करण्यात आले.

विदर्भाचा मुद्दा दिल्लीत
मांडत राहू-रामदास आठवले

नागपूर : रिपब्लिकन पक्ष हा नेहमीच स्वतंत्र विदर्भासह लहान राज्यांचा समर्थक राहिला आहे. यासंदर्भात आमची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. तेव्हा आपण विदर्भाचा मुद्दा दिल्लीत मांडत राहू तसेच नवीन राज्याची मागणी करणाºयांनाही आम्ही मदत करू, असे मत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. नवराज्य निर्माण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. श्रीहरी अणे आणि कार्यकारी अध्यक्ष राजा बुंदेला यांच्या शिष्टमंडळाने रविवारी दुपारी रविभवन येथे रामदास आठवले यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात नवीन राज्यासंदर्भात बरीच चर्चा झाली. नवराज्य निर्माण महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशनाबाबत त्यांना कल्पना देण्यात आली. नवीन राज्यासंदर्भात पंतप्रधानांशी लवकरच भेट घेण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. अणे आणि राजा बुंदेला यांनी सांगितले. यावेळी नवराज्य निर्माण महासंघाचे इतर सदस्यही उपस्थित होते.
रिपाइंतर्फे नोव्हेंबरमध्ये विदर्भ परिषद
रिपाइंच्यावतीने १० नोव्हेंबर रोजी विदर्भ परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसंदर्भात रविभवन येते रिपाइंच्या कार्यकर्त्यांसोबत केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी चर्चा केली. या परिषदेसाठी अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्यासह विदर्भवादी नेत्यांना आधीच निमंत्रित करण्यात आले आहे याची आठवणसुद्धा आठवले यांनी अणे यांना करून दिली.

Web Title: Meet the President for the demand of independent states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.