मॅट्रीमोनिअल साईटवर ओळखी, बेशुद्ध करून तरुणीवर अत्याचार

By योगेश पांडे | Updated: March 23, 2025 22:02 IST2025-03-23T22:02:00+5:302025-03-23T22:02:13+5:30

मॅट्रीमोनिअल साईटवर ओळखी झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत एका आरोपीने तरुणीवर अत्याचार केला.

Meet a young woman on a matrimonial site, rape her by knocking her unconscious | मॅट्रीमोनिअल साईटवर ओळखी, बेशुद्ध करून तरुणीवर अत्याचार

मॅट्रीमोनिअल साईटवर ओळखी, बेशुद्ध करून तरुणीवर अत्याचार

योगेश पांडे 

नागपूर :
मॅट्रीमोनिअल साईटवर ओळखी झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत एका आरोपीने तरुणीवर अत्याचार केला. त्याने कोल्ड्रींकमधून औषध देत तिला बेशुद्ध करून अत्याचार केला. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

नेहाल रविंद्र पाटील (३०, सिद्धार्थनगर, वारीसपुरा, कामठी) असे आरोपीचे नाव आहे. १ जानेवारी २०२३ रोजी त्याची २७ वर्षीय तरुणीशी शादी डॉटकॉम या ॲपच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर दोघेही नियमितपणे फोनवर बोलायला लागले. नेहालने तिच्या घरी जाऊन लग्नाची मागणी केली. त्यानंतर विश्वासाचा गैरफायदा घेत तो तिला कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ओयो हॉटेलमध्ये घेऊन गेला व तिच्यावर अत्याचार केला.

त्यानंतर मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लॉजमध्ये नेऊन त्याने तिला कोल्ड्रीक पाजले व अत्याचार केला. त्याने तिची छायाचित्रे व व्हिडीओ तयार केला. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याने लग्नाला नकार दिला व तिला बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे तरुणी हादरली. तिने कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Meet a young woman on a matrimonial site, rape her by knocking her unconscious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.