शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

गरीब रुग्णांच्या मदतीसाठी औषध बँक : नागपूर सिटीझन्स फोरमचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 8:55 PM

Medicines Bank to Help Poor Patientsकाेराेना महामारीच्या भीषण परिस्थितीत सामाजिक संघटना व संवेदनशील नागरिक मदतीसाठी कार्य करीत आहेत. असाच एक संवेदनशील उपक्रम नागपूर सिटीझन्स फाेरमच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. फाेरमतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘मेडिसीन बँके’च्या माध्यमातून शहरातील गरीब, गरजू रुग्णांना नि:शुल्क औषध वितरण करण्याचे कार्य तरुण सदस्यांनी सुरू केले आहे.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात लाख रुपयांचे औषध वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : काेराेना महामारीच्या भीषण परिस्थितीत सामाजिक संघटना व संवेदनशील नागरिक मदतीसाठी कार्य करीत आहेत. असाच एक संवेदनशील उपक्रम नागपूर सिटीझन्स फाेरमच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. फाेरमतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘मेडिसीन बँके’च्या माध्यमातून शहरातील गरीब, गरजू रुग्णांना नि:शुल्क औषध वितरण करण्याचे कार्य तरुण सदस्यांनी सुरू केले आहे.

फाेरमचे सदस्य प्रतीक बैरागी यांनी सांगितले, काेराेना रुग्णांवर उपचार करताना दिली जाणारी औषधे महागडी आहेत. १४ दिवसांचे औषध विकत घेण्यासाठी तब्बल अडीच ते दहा हजारांपर्यंत खर्च येतो. आर्थिक अडचणींचा सामना करणारे अनेक जण महागडी औषधे घेण्याचे टाळतात. फोरमच्या सदस्यांनी याविषयी शहराच्या विविध वस्त्यांमध्ये एक छोटे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात पाॅझिटिव्ह व्यक्तीचे नातेवाईक, मेडिकल स्टोर्स चालक व काही डाॅक्टरांशी संवाद साधला. फॅविपिरावीर नावाचे औषध न घेतल्यामुळे अनेक रुग्णांची प्रकृती खालावत असल्याचे या सर्वेक्षणात प्रामुख्याने आढळून आले. त्यामुळे फोरमने ‘दवा दान’ हा अनोखा उपक्रम सुरू केला. फोरमने शहरातील काेराेना आजारातून बरे झालेल्या नागरिकांकडून उरलेली औषधे दान रूपात बँकेत जमा करून ती गरीब व गरजू रुग्णांना मोफत पुरवली जातात. पाच लाभार्थी कुटुंबीयांना औषध किट देऊन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांच्या औषधीचे वितरण केले जाणार आहे. यासाठी औषध किट तयार करण्यात आली आहेत. या किटमध्ये फेविपिरावीर, पॅरासिटामाॅल, आयवरमॅक्टिन, लिमची, एझिथ्रोमायसिन, डाॅक्सी, झिंक, डी ३ रिस्क, एलेक्स कफ सिरप या औषधांचा १४ दिवसांचा डोस, मास्क आणि सॅनिटायझरचा समावेश आहे. अभिजित सिंह चंदेल, अभिजित झा, गजेंद्रसिंग लोहिया, अमित बांदूरकर व वैभव शिंदे पाटील आदी कार्यकर्ते या उपक्रमासाठी सक्रिय कार्य करीत आहेत. महानगरपालिकेच्या टेस्टिंग सेंटरवरील कोविड पाॅझिटिव्ह अहवाल, आधार कार्ड व डाॅक्टरांचे प्रिस्क्रिप्शन या आधारावर लाभार्थी निवडून त्यांच्या नातेवाइकांना या किट सोपवल्या जाणार असल्याचे बैरागी यांनी सांगितले.

टॅग्स :medicinesऔषधंbankबँक