शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

‘गोरखपूर’च्या मार्गावर मेडिकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:37 AM

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना (मेडिकल) औषधे खरेदीसाठी असलेले दर करार (रेट कॉन्ट्रॅक्ट) संपून दोन महिने झाले.

ठळक मुद्देजीवनरक्षक औषधांचा ठणठणाट : ‘आरसी’ संपून झाले दोन महिने

सुमेध वाघमारे । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना (मेडिकल) औषधे खरेदीसाठी असलेले दर करार (रेट कॉन्ट्रॅक्ट) संपून दोन महिने झाले. औषधांवर सेवा व वस्तूकर (जीएसटी) लावण्यात आल्याने औषध पुरवठादार जुन्या दरात औषधे देण्यास तयार नाहीत. यामुळे बहुसंख्य मेडिकलमध्ये जीवनरक्षक व जीवनोपयोगी औषधांचा ठणठणाट आहे.या गंभीर समस्येकडे वैद्यकीय शिक्षण विभागाचे (डीएमईआर) दुर्लक्ष झाल्याने राज्यातील मेडिकल ‘गोरखपूर’च्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. शेवटच्या घटका मोजणाºया रुग्णांसाठी मेडिकल रुग्णालय आशेचा किरण आहेत. रोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. परंतु पाचमधून केवळ दोन ते तीन औषधे उपलब्ध करून दिली जात आहे. इतर औषधांसाठी बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे. अतिदक्षता व आकस्मिक विभागातील रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयातून कमी आणि बाहेरूनच जास्तीतजास्त औषधे आणावी लागत असल्याचे चित्र आहे. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) जीवनरक्षक औषधे जेमतेम उरलेली आहेत,तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) ‘आरसी’ संपण्यापूर्वी औषधे घेतली असली तरी ‘आरसी’ला आणखी उशीर झाल्यास हेही रुग्णालय अडचणीत येण्याची शक्यता आहे. अशीच स्थिती राज्यभरातील सर्वच मेडिकलची आहे. विशेष म्हणजे, बहुसंख्य रुग्णालयांकडून ‘आरसी’ नूतनीकरणाचे पत्र व स्मरणपत्रही गेले आहे. परंतु वैद्यकीय शिक्षण विभाग अद्यापही याला गंभीरतेने घ्यायला तयार नसल्याचे दिसून येत आहे.पुरवठादाराने रोखले हातऔषधांवर जीएसटी लावण्यात आली आहे. परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना याबाबतची स्पष्ट माहिती दिली नाही. परिणामी, संभ्रम निर्माण झाला असून औषध पुरवठादाराने औषधे देण्यास तूर्तास तरी हात रोखले आहे.मोजकाच साठाजीवनरक्षक औषधांमध्ये सर्व सलाईन, सर्पदंश, कुत्रा चावल्यानंतर देण्यात येणारी लस, हृदयविकार, विष प्राशन व इतरही गंभीर प्रसंगी देण्यात येणाºया लसी येतात. साधारण ३५ ते ३० लसींचा यात समावेश असतो. सर्वच मेडिकल रुग्णालयांना आकस्मिक व अतिदक्षता विभागात याचा पर्याप्त मात्रेत साठा करून ठेवावा लागतो. परंतु सद्यस्थितीत हा साठा संपण्याच्या मार्गावर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे,स्थानिक खरेदीही बंदराज्यातील सर्व मेडिकलमधील औषधांची खरेदी १५ आॅगस्टपासून मध्यवर्ती खरेदी समितीमार्फत होणार होती. यामुळे स्थानिक खरेदी बंद करण्यात आली आहे. यातच ‘आरसी’ही संपल्याने मूलभूत औषधांसह दैनंदिन व जीवनरक्षक औषधे-प्रतिजैविकांचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. गोरगरीब रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत.औषधांची खरेदी आता मध्यवर्ती समितीमार्फतच होणार आहे. या समितीमार्फत ‘आरसी’ जर लवकर तयार होत असेल तर मुदतवाढ मिळणार नाही, परंतु यात जर वेळ लागत असेल तर मुदतवाढ देण्यात येईल. यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.-डॉ. प्रवीण शिनगारेसंचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग