शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल : टीबी वॉर्डचे क्वॉर्टरही धोकादायक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 23:47 IST

मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरातील त्वचा रोग विभागाचे गुरुवारी प्रवेशद्वारावरील स्लॅब कोसळून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेला घेऊन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे राजाबाक्षा व टीबी वॉर्ड परिसरातील निवासी गाळेधारकांमध्ये (क्वॉर्टर) भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्दे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब जगतात जीव मुठीत घेऊन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरातील त्वचा रोग विभागाचे गुरुवारी प्रवेशद्वारावरील स्लॅब कोसळून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेला घेऊन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे राजाबाक्षा व टीबी वॉर्ड परिसरातील निवासी गाळेधारकांमध्ये (क्वॉर्टर) भीतीचे वातावरण पसरले आहे. हे क्वॉर्टरही ४० वर्षे जुने व अनेक ठिकाणी तडे गेले आहे. मेडिकलचे बांधकाम विभाग केवळ तात्पुरती डागडुजीपलिकडे जात नसल्याने कधीही धोका होण्याची शक्यता येथील रहिवासी वर्तवित आहे.मेडिकलमध्ये सेवा देणाऱ्या चतुर्थ कर्मचाऱ्यांसाठी राजाबाक्षा परिसरात १२० तर टीबी वॉर्डाच्या परिसरात ९६ क्वॉर्टर आहेत. पूर्वी या क्वॉर्टरच्या देखभालीकडे व स्वच्छतेकडे स्वत: मेडिकल प्रशासन व बांधकाम विभाग लक्ष देऊन असायचे. अधिकारी या परिसराची पाहणी करायचे. परंतु गेल्या १५ वर्षांत या क्वॉर्टरकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याचे येथील काही कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. राजाबाक्षा येथे एक मजल्याचे सर्व्हंट क्वॉर्टर आहे. त्याची अवस्था फारशी चांगली नाही. या क्वॉर्टरच्या इमारतीचा कोणता भाग कधी पडेल याच नेम नाही. जुन्या काळातील इमारत असल्याने तग धरून असली तरी बांधकाम विभागाने इमारतीचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी येथील रहिवाशांची आहे. हे क्वॉर्टर तोडून अजनी मेडिकल क्वॉर्टरसारखे या भागातही अपार्टमेंट बांधून कर्मचाऱ्यांना गाळे द्यावेत, अशी नव्याने मागणी होऊ लागली आहे.कोणता भाग कधी पडेल याचा नेम नाहीयेथील लोकांनी सांगितले, क्वॉर्टर फार जुने आहे. यातच उंदीर, घुस यांनी अनेक ठिकाणी पोखरून ठेवले आहे. काही भिंतीना भेगाही गेल्या आहेत. विशेषत: पायरीच्या भिंती या कमजोर झाल्या आहेत. दर पावसाळ्यात क्वॉर्टरचा कोणता ना कोणता भाग पडतो. यामुळे रहिवाशांमध्ये नेहमीच भीतीचे वातावरण असते. डागडुजीसाठी बांधकाम विभागाला सांगितल्यानंतरच ते कामाला सुरुवात करतात. परंतु त्यापूर्वी त्यांच्याकडून क्वॉर्टरची पाहणी करीत नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.कचरा, गटारीचीही समस्याक्वॉर्टर परिसरातील कचऱ्याची उचल नियमित होत नाही. मोडकळीस आलेल्या गटार लाईनमुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कमी व्यासाच्या पाईपलाईनमुळे कधी गटारी तुंबणार आणि त्याची घाण क्वॉर्टरमध्ये शिरणार याचा नेम नाही. विशेषत: पावसाळ्यात ही समस्या वारंवार उद्भवते. क्वॉर्टरमधील सार्वजनिक शौचालय निवासी गाळ्यांपासून दूर आहेत. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याने दुर्गंधी पसरलेली असते.

टॅग्स :Medicalवैद्यकीयnagpurनागपूरEmployeeकर्मचारी