मेडिकलच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
By Admin | Updated: April 4, 2017 23:19 IST2017-04-04T23:19:28+5:302017-04-04T23:19:28+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) व्यवसायोपचार विभागातील (आॅक्युपेश्नल थेरपी) द्वितीय वर्षाच्या एका विद्यार्थिनीने मंगळवारी

मेडिकलच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 04 - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) व्यवसायोपचार विभागातील (आॅक्युपेश्नल थेरपी) द्वितीय वर्षाच्या एका विद्यार्थिनीने मंगळवारी सायंकाळी आत्महत्या केली. वसतिगृह क्र. ६च्या खोलीत घडलेल्या या घटनेने महाविद्यालयात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये वर्षभरातील ही दुसरी घटना आहे. करीश्मा राऊत (२१) रा. भंडारा असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करीश्मा राऊत मनमिळावू विद्यार्थिनी होती. अभ्यासातही हुशार होती. घटनेच्या दिवशी मंगळवारी ती आपल्या मैत्रीणीसोबत सामान्यपणे होती. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ती आपल्या खोलीत असताना मैत्रणीला दूध आणण्यास पाठविले. ही विद्यार्थिनी जेव्हा दूध घेऊन परत आली, तेव्हा खोलीचे दार आतून बंद होते. तिने आजू-बाजूच्या मैत्रणीला बोलवून घेतले, काही झाल्याची शंका आल्यावर तिने सुरक्षा रक्षकाच्या मदतीने दार तोडले. खोलीच्या आत प्रवेश घेताच करीश्मा खाली पडलेली होती. तिच्या गळ्यात तुटलेली रस्सी होती. तिला लागलिच मेडिकलच्या अपघात विभागात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत्यू झाल्याची माहिती दिली. करिश्माला मिरगीचा आजार होता. या आजारपणामुळे तिने आत्महत्या केली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी महाविद्यालय गाठले. अजनी पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. करीश्माला वडील नाहीत. आई, मोठा भाऊ व बहीण आहे. त्यांना याची माहिती देण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे, १४ आॅगस्ट २०१६ रोजी मेडिकलच्याच वसतिगृह क्र. ५ च्या ४६ क्रमांकाच्या खोलीत फिजीओथेरपीच्या प्रथम वर्षाचा माजी विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली होती.