चिमुकलीच्या मृत्यूने मेडिकलमध्ये तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:07 IST2021-04-05T04:07:54+5:302021-04-05T04:07:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेडिकलमध्ये दाखल असलेल्या एका तीन वर्षीय चिमुकलीला इंजेक्शन लावल्यानंतर तिचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी ...

चिमुकलीच्या मृत्यूने मेडिकलमध्ये तणाव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलमध्ये दाखल असलेल्या एका तीन वर्षीय चिमुकलीला इंजेक्शन लावल्यानंतर तिचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी ही घटना घडल्यानंतर नातेवाइकांनी चुकीच्या उपचारामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. अनिका शिवकुमार शाहू असे मृत मुलीचे नाव आहे. ती सक्करदऱ्यातील कॉर्पोरेशन शाळेजवळ राहत होती. अनिकाला फिट येण्याचा आजार होता. तिला तिच्या पालकांनी शनिवारी सायंकाळी मेडिकलमध्ये दाखल केले. रविवारी दुपारी ३च्या सुमारास मेडिकलच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी इंजेक्शन लावले. त्यानंतर, काही वेळेतच ती मृत झाली. त्यामुळे अनिकाचे नातेवाईक संतप्त झाले. चुकीचे इंजेक्शन लावल्यामुळेच अनिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त नातेवाइकांनी केला. त्यांनी रोष व्यक्त केल्याने मेडिकलमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती कळताच अजनीचे पोलीस पथक तेथे पोहोचले. दरम्यान, अनिकाचे वडील शिवकुमार फुलचंद शाहू (वय ३०) यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर प्रकरण सक्करदरा पोलिसांकडे वर्ग केले. या प्रकरणात सक्करदरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
- शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच काही बोलता येईल...
तीन वर्षांची ती मुलगी जन्मत: दिव्यांग होती. तिला झटक्यांचा आजार होता. यापूर्वी ती बऱ्याच वेळा रुग्णालयात येऊन उपचार घेतला. शनिवारी सायंकाळी तिला झटके सुरू झाल्याने मेडिकलच्या बालरोग विभागातील ‘आयसीयू’मध्ये भरती करण्यात आले होते. आज दुपारी उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. तिच्या वडिलाच्या तक्रारीवरून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यावरच काही बोलता येईल. रविवारी तिला अॅण्टीबायोटिक इंजेक्शन देण्यात आले होते.
-डॉ.दीप्ती जैन
प्रमुख, बालरोग विभाग, मेडिकल
---