शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

Nagpur | मेडिकल स्टोअर फोडून साडेचार लाखांवर डल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2022 17:31 IST

नागपुरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

नागपूरनागपूरच्या प्रसिद्ध मेयो रुग्णालयजवळ असलेल्या श्याम मेडिकल स्टोअर्स मधून पहाटेच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी साडेचार लाख रुपये चोरून नेले. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे. तिघेही चोरटे पहाटेच्या सुमारास दुकानाचा शटर वाकवून आत मध्ये शिरले आणि दुकानात ठेवलेले साडेचार लाख रुपये घेऊन पसार झाले. 

प्रकाश द्वारकादास कल्याणी (७१) यांचे मेयो इस्पितळाजवळ श्याम मेडिकल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. ४ जुलै रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी रात्री ११ वाजता दुकान बंद केले. रात्रभरात अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून दुकानात प्रवेश केला. कॅश काऊंटर तोडून ९ ड्रॉवर्समध्ये ठेवलेले साडेचार लाख रुपये चोरले. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता दुकान उघडण्यासाठी कर्मचारी आले असता ही बाब उघडकीस आली.

कर्मचाऱ्यांनी तत्काळ कल्याणी यांना माहिती दिली. कल्याणी यांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. सीसीटीव्हीची पाहणी केली असता तीन अज्ञात आरोपींनी दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला होता. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरांचा शोध घेण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीtheftचोरीnagpurनागपूर