शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

अमृत महोत्सवासाठी मेडिकल सज्ज; राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन

By सुमेध वाघमार | Updated: November 25, 2023 20:08 IST

या महोत्सवाचे उद्घाटन १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे.

 नागपूर: मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालय असलेले नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) हे अमृत महोत्सवासाठी सज्ज झाले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला देश-विदेशातील मिळून जवळपास तीन हजार विद्यार्थी उपस्थित राहतील, अशी माहिती मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी दिली.

शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत डॉ. गजभिये बोलत होते. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहुरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. उदय नारलावार, डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. रुजिता फुके, डॉ. मुरली, डॉ. वाईकर आदी उपस्थित होते. डॉ. गजभिये म्हणाले, या महोत्सवाच्या उद्घाटनाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रपतींच्या हस्ते चार मान्यवरांचा सत्कारमेडिकलला १९६ एकरची जागा दान करणारे कर्नल डॉ. कुकडे यांचे नातू अ‍ॅड. दिनकर कुकडे, मेडिकलमधून उत्तीर्ण होणाºया पहिल्या बॅचचे विद्यार्थी डॉ. बी.जे. सुभेदार, लेक्चर हॉलच्या नुतनीकरणसाठी ५३ लाखांची मदत करणाऱ्या माजी विद्यार्थिनी डॉ. शकुंतला गोखले यांच्या नातेवाईकांचा व सुपर स्पेशालिटीच्या मेंदूरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद गिरी यांच्या सत्कार राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. 

डाक तिकीट कव्हरपेजचे अनावरणडॉ. गजभिये म्हणाले, मेडिकलच्या अमृत महोत्सवाचा विशेष टपाल तिकीटाचे अनावरण राष्टÑपतींच्या हस्ते होणार आहे. मेडिकलच्या दोन नवनिर्मित सभागृहांचे डिजीटल उद्घाटनही त्यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमातच राज्यपालांच्या हस्ते अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे तसेच कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात येईल.

रुग्णांची गैरसोय होणार नाही अमृत महोत्सव सोहळ्याचा फटका मेडिकलमधील रुग्णांना बसणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. सोहळ्याला येणाºयांच्या बसण्यापासून ते पार्र्किंगची विशेष सोय करण्यात आली असल्याचेही डॉ. गजभिये म्हणाले.

माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याने महोत्सवाची सांगता अमृत महोत्सवाच्या उद्घाटनानंतर मेडिकलच्या विविध विभागांमध्ये पुढील १५ दिवस परिसंवाद, कार्यशाळा, चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. महोत्सवाची सांगता २२ व २३ डिसेंबर रोजी देश-विदेशात विविध क्षेत्रात कार्यरत  मेडिकलच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याने होणार आहे. 

मेडिकलला भेट देणाऱ्या तिसऱ्या राष्ट्रपतीअमृत महोत्सवाच्या निमित्ताने नागपूर मेडिकलला भेट देणाऱ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या तिसऱ्या राष्ट्रपती ठरणार आहेत. यापूर्वी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते १९५३ मध्ये ‘मेडिकल’चे लोकार्पण करण्यात आले.  १९९५ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती  डॉ. शंकर दयाल शर्मा यांच्या हस्ते मेडिकलच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. 

टॅग्स :nagpurनागपूरDraupadi Murmuद्रौपदी मुर्मू