शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

मेडिकल कॉलेज इस्पितळातील औषधे पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 8:22 PM

शुक्रवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी औषध भांडारात शिरल्याने औषधे पाण्यात भिजली. येथील कर्मचाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करीत भांडारातील पाणी बाहेर फेकणाºया दोन्ही मोटार सुरू केल्या तर औषधांचे डबे वऱ्हांड्यात ठेवल्याने मोठे नुकसान टळले.

ठळक मुद्देवऱ्हांड्यात ठेवावा लागला औषधांचा ढीग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शुक्रवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी औषध भांडारात शिरल्याने औषधे पाण्यात भिजली. येथील कर्मचाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करीत भांडारातील पाणी बाहेर फेकणाऱ्या दोन्ही मोटार सुरू केल्या तर औषधांचे डबे वऱ्हांड्यात ठेवल्याने मोठे नुकसान टळले.मेडिकलचे जुने औषध भंडार विभाग हे तळमजल्याच्याही खाली आहे. सुमारे ६० वर्षे जुने असलेल्या भांडारात दरवर्षी पावसाचे पाणी शिरते. ते काढण्याकरीता दोन पंप लावण्यात आले आहे. शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी विभागात शिरले. दोन्ही पंप सुरूही करण्यात आले. परंतु भांडारात पाणी शिरण्याचा ओघ मोठा असल्याने याचा फटका औषधांना बसला. कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवित पाण्यात भिजलेल्या औषधांचे बॉक्स वाळण्यासाठी व्हरांड्यात ठेवले. परंतु भिंतीतून पावसाचे पाणी झिरपत असल्याने बॉक्स खराब झाले. काही औषधे पाण्यात भिजल्याने रुग्णांसाठी त्याचा उपयोग होणार नसल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, हाफकिन कंपनीकडून आवश्यक त्या प्रमाणात औषधांचा पुरवठा अद्यापही मेडिकलला झाला नाही. यामुळे रुग्णालयात औषधांचा तुटवडा पडला आहे. रुग्णांना पदरमोड करून औषधे विकत घ्यावी लागत असताना औषधे भिजल्याने याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.नऊ कोटींचे भांडार कोणासाठी?मेडिकलमधील औषधे साठवून ठेवण्यासाठी २०१४ मध्ये ९ कोटी २१ लाख रुपये खर्चून नवीन औषधालय बांधण्याचे काम सुरू झाले. तीन माळ्यांची ही इमारत बांधकाम पूर्ण होऊन सहा महिन्यावर कालावधी झाला आहे. प्रत्येक माळ्यावर औषध साठवणुकीसाठी वातानुकूलित कक्षाची व्यवस्था आहे. मात्र, चार वर्षांचा कालावधी लोटूनही इमारतीत आवश्यक सोयी नसल्याने ही इमारत औषधे विभागाकडे हस्तांतरीत झाली नसल्याची माहिती आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयRainपाऊस