मेडिकल कॉलेजला हवे सुरक्षा कवच

By Admin | Updated: November 24, 2015 06:07 IST2015-11-24T06:07:26+5:302015-11-24T06:07:26+5:30

बदलत्या काळात सर्वच भाविनक बंध क्षीण होत आहेत. हीच गोष्ट दुर्दैवाने डॉक्टरी पेशातसुद्धा आली आहे. परिणामी, डॉक्टर

Medical college needs protection | मेडिकल कॉलेजला हवे सुरक्षा कवच

मेडिकल कॉलेजला हवे सुरक्षा कवच

नागपूर : बदलत्या काळात सर्वच भाविनक बंध क्षीण होत आहेत. हीच गोष्ट दुर्दैवाने डॉक्टरी पेशातसुद्धा आली आहे. परिणामी, डॉक्टर व रु ग्णांचे संबंध बिघडत चालले आहेत. यातून डॉक्टरांवरील हल्ले वाढत आहेत. या वर्षी राज्यभरातील मेडिकल रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांवर ३१ हल्ले झाले आहेत. याला घेऊन निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने डॉक्टरांना सुरक्षा पोचविण्यासाठी रुग्णालयांत सुरक्षा रक्षक वाढविण्याची मागणी केली होती. यावर नेमण्यात आलेल्या सुरक्षा आॅडिट समितीने राज्यभरातील १५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये (मेडिकल) अतिरिक्त ८२२ सुरक्षा रक्षक वाढविण्याचा अहवाल दिला आहे. सद्यस्थितीत या रुग्णालयांमध्ये ६८३ सुरक्षा रक्षक जबाबदारी सांभाळत असून असुरक्षितेच्या वातावरणात निवासी डॉक्टर आपली रुग्णसेवा देत आहे.
औरंगाबाद येथे ११ महिन्यात मेडिकलमध्ये कार्यरत असलेल्या निवासी डॉक्टरांवर सहा हल्ले झाले आहेत. नुकतेच केईएममध्ये दोन तर नांदेड येथे तीन हल्ले झाले आहेत. हल्ल्यांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. डॉक्टरांवरील हल्लेविरोधात कायद्याला राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.
या कायद्यात हल्लेखोरांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करणे, तीन वषार्ची सक्तमजुरी, ५० हजार रुपये दंड आणि मालमत्तेचे नुकसान झाल्यास दुप्पट वसुली करणे अशी तरतूद करण्यात आली आहे. मात्र या कायद्याला मंजुरी मिळूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय.
सीसीटीव्ही व वॉकीटॉकी यंत्र वाढविण्याचाही प्रस्ताव
राज्यातील १४ मेडिकलमध्ये ३७१ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. समितीने यात वाढ करून ६६८ सीसीटीव्ही लावण्याचा अहवाल दिला आहे. सोबतच उपलब्ध ८८ वॉकीटॉकी यंत्रामध्ये वाढ करून ते २१० करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

Web Title: Medical college needs protection