त्रिशरण चौकातील मांस विक्री दुकाने हटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:12 IST2021-08-21T04:12:31+5:302021-08-21T04:12:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी धंतोली झोन क्षेत्रातील अजनी येथील त्रिशरण चौकातील मांस विक्रीची ...

त्रिशरण चौकातील मांस विक्री दुकाने हटविली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी धंतोली झोन क्षेत्रातील अजनी येथील त्रिशरण चौकातील मांस विक्रीची दुकाने हटविली, तसेच विक्रेत्यांचे साहित्य जप्त केले.
पथकाने धंतोली झोन क्षेत्रातील नरेंद्रनगर ते योगीनगर, त्रिशरण चौक ते वंजारीनगर, टीबी वॉर्ड ते मेडिकल चौकच्या दरम्यान कारवाई करून २५ अतिक्रमण हटविले.
लकडगंज पथकाने छापरूनगर चौक ते वर्धमाननगर चौक, प्रजापती नगर चौक ते एचबी. टाऊन चौक व पारडी येथील हनुमान मंदिर चौक दरम्यानची ५४ अतिक्रमण हटविले. तिसऱ्या पथकाने हनुमाननगर झोनमधील बुधवार बाजार हटविला, तसेच क्रीडा चौक ते तुकडोजी पुतळा चौक येथील बिर्याणी विक्रेत्यांवर कारवाई केली. मानेवाडा चौक ते बेसा रोडवरील फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले.