शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का; MUDA प्रकरणात लोकायुक्त पोलिसांच्या क्लीन चिटवर न्यायालय समाधानी नाही
2
"लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत आता ५०० रुपयांवर आली, उद्या...!"; राऊतांचा हल्लाबोल
3
Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अमेरिकेच्या सर्वात शक्तिशाली फायटर जेटच्या चिंधड्या! रशियाच्या 'या' मिसाइलनं केली कमाल; टेंशनमध्ये आला पाकिस्तान
4
दानवेंसोबतचा वाद मातोश्रीवर मिटला! ठाकरेंची भेट घेतल्यावर खैरे म्हणाले, “आम्ही दोघे आता...”
5
अयोध्येतील राम मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, तामिळनाडूतून ईमेल, सुरक्षा यंत्रणा अलर्ट!
6
“मंत्र्यांचे पगार, बंगले नुतनीकरणास निधी, पण शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसा नाही”: आदित्य ठाकरे
7
ज्या बंदुकीच्या टोकावर दरोडेखोरांनी ३० तोळे सोनं लुटलं तीच निघाली प्लॅस्टिकची..! पुण्यातील प्रकार
8
आणखी थोडी किंमत वाढविली असती तर ५० लाखच टच...! फोक्सवॅगनची नवीन एसयुव्ही भारतात लाँच झाली...
9
रस्ता ओलांडताना भरधाव ट्रेलरची धडक, आठ वर्षाची चिमुकली जागीच ठार, नवी मुंबईतील घटना
10
चैत्र संकष्ट चतुर्थी: राशीनुसार ‘या’ मंत्रांचे जप करा, भरघोस लाभ मिळवा; कोणते उपाय करावेत?
11
आधी २४ यार्ड्समधील 'दुश्मनी'चं प्रकरण गाजलं; आता रिलीज झालं बुमराह-नायर यांच्यातील 'दोस्ती'चं गाणं
12
शिंदे यांची दादांविरूद्ध तक्रार, अमित शाह यांच्या उत्तराचा राऊतांकडून सस्पेन्स
13
लॉकी फर्ग्युसनच्या जागी कोण खेळणार? पंजाबकडे आहेत 'हे' ३ घातक गोलंदाज!
14
ईडीची सोनिया आणि राहुल गांधींविरोधात मोठी कारवाई; मनी लाँड्रिंगच्या आरोपपत्रात दोघांचेही नाव, लवकरच सुनावणी
15
Tariff War: चायनीज एअरलाइन्सला जिनपिंग यांचं 'फर्मान'; ट्रम्प यांना तगडा झटका! होणार मोठं नुकसान?
16
लाडकी बहीण योजनेतील ८ लाख महिलांना ५०० रुपयेच मिळणार? राज्यमंत्र्यांनी खरे काय ते सांगितले
17
बंगाल हिंसाचाराचे बांगलादेश कनेक्शन; पैशांचे फंडिंग झाल्याचे पुरावे, रामनवमीची ठरली होती तारीख
18
यावर्षी १०५ टक्के पाऊस होणार, हवामान विभागाचा मान्सूनबद्दलचा ताजा अंदाज
19
पलक तिवारीला डेट करतोय का? इब्राहिम अली खानने पहिल्यांदाच दिलं उत्तर, म्हणाला...
20
दोन बहिणींची कमाल, ChatGPT वापरुन केलं घराचं रिनोव्हेशन, लाखो रुपये वाचवून ‘असं’ सजवलं घर!

नागपुरातील  कुख्यात हिरणवार टोळीवर मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 23:54 IST

विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात हिरणवार टोळीतील सात गुन्हेगारांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई केली.

ठळक मुद्देअनेक गंभीर गुन्हे : सात गुंडांना कारागृहात डांबले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात हिरणवार टोळीतील सात गुन्हेगारांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई केली.काचीपुऱ्यातील चामडीया झोपडपट्टीत राहणारा टोळीचा म्होरक्या शैलेश ऊर्फ बंटी विनोद हिरणवार (वय२४), साहिल ऊर्फ सोनू दिलीप शेंदरे (वय २२), करण प्रशांत शेंडे (वय २४), पवन धीरज हिरणवार (वय २१), शक्ती राजेश यादव (वय २०), सूरज धीरज हिरणवार (वय २४) आणि सौरभ ऊर्फ मोन्या प्रवीण कालसर्पे (वय २४, रा. संभाजी नगर झोपडपट्टी मनमाड, जि. नाशिक) अशी मोक्काची कारवाई झालेल्या गुंडांची नावे आहेत. बुधवारी या संबंधाने पोलीस आयुक्तालयातून आदेश निघाल्यानंतर या गुंडांना कारागृहात डांबण्यात आले.अनेक वर्षांपासून हिरणवार टोळीतील गुंड गुन्हेगारीत सक्रिय आहेत. त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात एकूण १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. २४ मे च्या रात्री बजाजनगर चौकातील बैठक रेस्टॉरंटमध्ये हे गुंड शिरले. तेथे व्यवस्थापक असलेल्या अभिषेक ऊर्फ बबलू राजेश पटले हा आधी हिरणवार टोळीच्या गुंडांसोबत मैत्री ठेवून होता. या गुंडांनी काही दिवसांपूर्वी हिरणवार टोळीतील विरोधी गुंडांसोबत न्यायालय परिसरात बोलताना पटलेला पाहिले. त्यामुळे पटले विरोधी टोळीतील गुंडासोबत जाऊन मिळला असा त्यांना संशय आला. या संशयातून आरोपींनी पटलेसोबत भांडण करून विरोधी गटातील गुंडांसोबत बोलू नको म्हणून विचारणा केली. ते आरडाओरड आणि शिवीगाळ करीत असल्याचे पाहून हॉटेलचे संचालक डोनाल्ड बाबाराव ढोमणे यांनी आरोपींना हटकले. त्यांना हॉटेल बाहेर जाण्यास सांगितले. यामुळे आरोपींनी हॉटेलमधील टेबल, खुर्ची आदी सामानांची तोडफोड करून डोनाल्ड यांच्यावर घातक शस्त्रांनी हल्ला चढवला. त्यात डोनाल्ड गंभीर जखमी झाले होते. बजाजनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.फरार, अटक अन् कारागृहाचा रस्तागुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होते. ३ जूनला त्यांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, या आरोपींचा गुन्हेगारी अभिलेख बघून पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर मोक्का लावण्याचे आधीच आदेश दिले. त्यानुसार, कागदोपत्री पूर्तता झाल्यानंतर हिरणवार टोळीच्या उपरोक्त गुंडांवर मोक्का लावून त्यांना कारागृहात डांबण्यात आले.

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर