शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
3
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
5
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
6
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
7
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
8
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
9
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
10
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
11
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
12
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
13
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
14
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
15
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
16
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
17
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
18
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
19
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
20
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा

नागपूरच्या जग्गू गोखले टोळीविरुद्ध मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:32 IST

वारंवार गंभीर गुन्हे करून शहरात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात जग्गू ऊर्फ जगदीश विजय गोखले आणि त्याच्या टोळीतील सहा गुंडांवर पोलिसांनी मोक्का लावला आहे. टोळीप्रमुख गोखले अद्यापही फरार आहे, हे विशेष!

ठळक मुद्देहत्या, दरोडा, लुटमारीचे २७ गुन्हे : संघटित गुन्हेगारीतून उपराजधानीत दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वारंवार गंभीर गुन्हे करून शहरात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात जग्गू ऊर्फ जगदीश विजय गोखले आणि त्याच्या टोळीतील सहा गुंडांवर पोलिसांनी मोक्का लावला आहे. टोळीप्रमुख गोखले अद्यापही फरार आहे, हे विशेष!जग्गू ऊर्फ जगदीश विजय गोखले (वय २१, रा. तांडापेठ, पाचपावली), नीतेश प्रकाश माहुरे (वय २१, रा. तांडापेठ, पाचपावली), आकाश चंद्रभान पराते (वय २०, रा. बाळाभाऊपेठ, पाचपावली), मंगेश संजय ठाकरे (वय २२, रा. पाचपावली), शेखर नरेश वर्मा (वय १९, रा. दुर्गा मंदिरजवळ कळमना) आणि आकाश मदन पिल्लेवार (वय २०, दुर्गा मंदिरजवळ कळमना), अशी मोक्का लावलेल्या गुंडांची नावे आहेत. या गुंडांवर हत्या, हत्येचा प्रयत्न, चोरी, दरोडा, लुटमार अशाप्रकारचे एकूण २७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या मोकाट वावरण्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जानमालाला धोका असल्याचे ध्यानात घेऊन, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांनी जरीपटक्याचे ठाणेदार पराग पोटे तसेच त्यांच्या सहकाºयांना गोखलेच्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. पोटे आणि त्यांच्या सहकाºयांनी त्यानुसार जग्गू गोखले आणि त्याच्या टोळीतील गुंडांचा क्राईम रेकॉर्ड एकत्रित करून त्यांच्याविरुद्ध मोक्काचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव उपायुक्त पोद्दार यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर यांच्याकडे सादर करण्यात आला. १८ जानेवारीला अतिरिक्त आयुक्त गायकर यांनी त्या प्रस्तावाला मान्यता देऊन गोखले टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कायदा १९९९ अन्वये कारवाईचे आदेश दिले. त्यावरून जरीपटका पोलिसांनी गोखले टोळीविरुद्ध मोक्का लावला.विशेष म्हणजे, या टोळीचा सूत्रधार जग्गू गोखले आणि त्याचा साथीदार आकाश पराते हे दोघे फरार असून, उर्वरित गुंडांना गेल्या आठवड्यातच पोलिसांनी अटक केली होती. फरार गोखले, परातेचा पोलीस शोध घेत आहेत.एकाच रात्री अनेकांना लुटलेकुख्यात गोखले आणि त्याच्या टोळीतील गुंडांनी तीन महिन्यांपूर्वी शहरातील जरीपटका, पाचपावली, गणेशपेठ, शांतिनगर, बेलतरोडी आणि धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेकांना लुटले होते. शस्त्राचा धाक दाखवून रोख आणि मौल्यवान चीजवस्तू हिसकावून नेल्या होत्या. दोन मोटरसायकलवर पाठलाग करून गोखले आणि त्याच्या पाच साथीदारांनी कडबी चौक ते मंगळवारी रेल्वे पुलावर मोहम्मद नावेद मोहम्मद असलम परवेज (वय १९, रा. आझाद चौक, सदर) याला रोखले. त्याला चाकू लावून त्याच्या जवळचे रोख तीन हजार, मोबाईल तसेच दुचाकीची चावी हिसकावून नेली होती. असलमच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी कलम ३९५, ३४१ भादंवि तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा सहकलम १४२ अन्वये गुन्हा नोंदविला होता.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMCOCA ACTमकोका कायदा