शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील ३० मेडिकल कॉलेजमधील 'एमबीबीएस' जागा संकटात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 14:37 IST

'एनएमसी'कडून गंभीर त्रुटींची नोंद : मेयोसह अनेक महाविद्यालये चौकशीच्या फेऱ्यात

सुमेध वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातील एकूण ३० शासकीय वैद्यकीयमहाविद्यालये आणि त्यांच्या एमबीबीएसच्या जागांवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून (एनएमसी) संकटाची टांगती तलवार आहे. या महाविद्यालयांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण त्रुटी आढळल्याने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी एमबीबीएसच्या जागांच्या वार्षिक नूतनीकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 'एनएमसी'ने या गंभीर बाबीची दखल घेत, बुधवारी (दि. १८) यावर सुनावणी ठेवली आहे.

एनएमसी'च्या पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाने राज्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे मूल्यांकन केले होते. हे मूल्यांकन महाविद्यालयांनी सादर केलेली स्व-प्रमाणित घोषणा पत्र, आधार-सक्षम बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीतील प्राध्यापकांची उपस्थिती, क्लिनिकल मापदंड आणि पायाभूत सुविधा यावर आधारित होते. मात्र, अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विविध मापदंडांवर गंभीर त्रुटी आढळल्या. महत्त्वाचे म्हणजे, निदर्शनास आणलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी संस्थांकडून कोणतेही प्रयत्न झाले नसल्याचे निरीक्षणही 'एनएमसी'ने नोंदवले आहे, तसे पत्र १३ जून रोजी सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना पाठविण्यात आले आहे. 

या महाविद्यालयांमधील एमबीबीएसच्या जागा धोक्यातविदर्भातील आठ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसोबतच डॉ. वैशंपायन मेमोरियल मेडिकल कॉलेज, सोलापूरसह बारामती, अंबरनाथ, रत्नागिरी, उस्मानाबाद, सातारा, मुंबई, बुलढाणा, जालना, वाशिम, अलिबाग, हिंगोली, जळगाव, मिरज, नंदुरबार, परभणी, सिंधुदुर्ग, राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे, आई फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड व लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज, सायन, मुंबई येथील एमबीबीएसच्या जागा धोक्यात आल्या आहेत.

'शो कॉज' नोटीसकडेही दुर्लक्षित

  • प्रत्येक महाविद्यालयाचे सखोल मूल्यांकन केल्यानंतर, 'एनएमसी'ला आढळलेल्या त्रुटींबाबत 'शो कॉज नोटीस' जारी करण्यात आल्या होत्या.
  • या नोटीसला संबंधित संस्थांनी सादर केलेले अनुपालन अहवाल तपासकांनी तपासले. मात्र, तपासकांना ते समाधानकारक आणि पटण्यासारखे आढळले नसल्याचे पत्रात नमूद आहे.

आज होणार सुनावणीनियामक मानकांचे उल्लंघन झाल्याने 'एनएमसी'ने बुधवारी (दि. १८) वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि संचालकांना सुनावणीसाठी दिल्लीतील मुख्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

विदर्भातील तब्बल आठ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये त्रुटीराज्यातील ज्या ३० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 'एनएमसी'ला त्रुटी आढळून आल्या त्यात विदर्भातील तब्बल आठ महाविद्यालये आहेत. यात नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह (मेयो), अकोला, भंडारा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचा समावेश आहे.

टॅग्स :nagpurनागपूरMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालय