शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

महापौर आपल्या दारी : पाणीटंचाई, नाल्याची दुर्गंधी अन् गडरलाईनमुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 9:17 PM

उत्तर नागपुरातील आसीनगर झोन क्षेत्रातील प्रभाग २ व ३ मधील बहुसंख्य वस्त्यांत पाण्याची टंचाई आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पिवळी नदी व परिसरातून वाहणाऱ्या नाल्याची साफसफाई होत नसल्याने दुर्गंधी तसेच गडर लाईन तुंबणे व साफसफाई होत नसल्याने नागरिक त्रस्त आहे. महापौर आपल्या दारी उपक्रमात नागरिकांनी महापौर नंदा जिचकार यांच्याकडे यासंदर्भात तक्रारी मंडल्या.

ठळक मुद्देआसीनगर झोनमधील नागरिकांनी मांडल्या समस्या

लोकमत न्यूज नटेवर्कनागपूर : उत्तर नागपुरातील आसीनगर झोन क्षेत्रातील प्रभाग २ व ३ मधील बहुसंख्य वस्त्यांत पाण्याची टंचाई आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पिवळी नदी व परिसरातून वाहणाऱ्या नाल्याची साफसफाई होत नसल्याने दुर्गंधी तसेच गडर लाईन तुंबणे व साफसफाई होत नसल्याने नागरिक त्रस्त आहे. महापौर आपल्या दारी उपक्रमात नागरिकांनी महापौर नंदा जिचकार यांच्याकडे यासंदर्भात तक्रारी मंडल्या.अतिक्रमण, सांडपाणी, अस्वच्छता या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा. मूलभूत सोयी-सुविधा हा नागरिकांचा अधिकार आहे. त्यामुळे नागरिकांच्या प्रत्येक तक्रारींची दखल घेऊन त्याचे तात्काळ निरसन करा, असे निर्देश महापौरांनी दिले. महापौर आपल्यादारी उपक्रमांतर्गत बुधवारी महापौरांनी आसीनगर झोनमधील प्रभाग २ व ३ चा आढावा घेतला. यावेळी आरोग्य समिती सभापती मनोज चापले, नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक मनोज सांगोळे, दिनेश यादव, परसराम मानवटकर, गोपीचंद कुमरे, नेहा निकोसे, नसीम बानो इब्राहीम खान, सहायक आयुक्त विजय हुमने, आसीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, यांच्यासह ओसीडब्ल्यूचे कर्मचारी व संबंधित विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.आसीनगर झोनमधील रिपब्लिकननगर, वरपाखडनगर, मिसाल ले-आऊट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी, सहयोगनगर, सुगतनगर, बाबा दीपसिंग नगर, नारी गाव, पिवळी नदी, दीक्षितनगर, संतोषनगर, भन्ते आनंद कौसल्यायन नगर, उप्पलवाडी, भीमवाडी, शिवाजीनगर, गरीब नवाजनगर, वनदेवीनगर आदी ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. झोनमधील सर्व भागामध्ये टँकरनेच पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी केली. सुगतनगर परिसरात बुद्धविहाराच्या बाजूला असलेली विहीर कोरडी असून त्या विहिरीमध्ये नागरिक कचरा टाकून तो जाळत असल्याचे दौºयामध्ये निदर्शनास आले. या विहिरीची स्वच्छता करून येथे कचरा टाकणाºयांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. बाबा दीपसिंग नगरातील काच कंपनीजवळील गुरुद्वारापुढील ५०० मीटर लांबीच्या कच्च्या मागार्मुळे नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो.नारी वस्ती परिसरात जनावरांच्या सुरक्षेसाठी पशु दवाखान्याच्या मागणीवर कार्यवाही करा, नारी वस्ती परिसरातील दहन घाटावर मनपाच्या पुढाकारातून शोक सभागृह निर्माण करण्यात आले आहे. या ठिकाणी भगवान शिव शंकराच्या मूतीर्ची प्रतिष्ठापना करण्याची मागणी नागरिकांंनी केली.कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाईकनक रिसोर्सेच्या कचरा उचलणाऱ्या गाड्या येत नसल्याचीही तक्रार नागरिकांकडून करण्यात आली. परिसरातील रस्त्याच्या कामाबाबत त्वरीत कारवाई करून स्वच्छतेच्या बाबतीत कामचुकारपणा करणाऱ्या कनक रिसोर्सेसवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश महापौरांनी दिले.पिवळी नदीला सुरक्षा भिंत घालानारी वस्ती लगत वाहणाऱ्या पिवळी नदीमुळे पावसाळ्यात नागरिकांचे मोठे नुकसान होते. नदीच्या तिरावर वस्तीलगत सुरक्षा भिंत नसल्यामुळे पावसाळ्यात वस्तीमध्ये पाणी शिरते. यामध्ये नागरिकांच्या घरातील सामान, जनावरे वाहून जाण्यासह जीवितहानीही झाल्याची तक्रार नागरिकांनी यावेळी केली. सुरक्षा भिंतीबाबत तात्काळ प्रस्ताव सादर करून पावसाळ्यापूर्वी सुरक्षा भिंत तयार करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.अपार्टमेंटमधील सांडपाणी रस्त्यावरन्यू दीक्षित नगर परिसरात असलेल्या एका अपार्टमेंटमधील सांडपाणी थेट रस्त्यावर येत असल्याने तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या मागांचें सिमेंटीकरण करून सांडपाणी रस्त्यावर येऊ नये यासाठी प्रतिबंध घालण्याचे निर्देश महापौरांनी दिले. नागरिकांनी दीक्षित नगरमधील उद्यानांचा विकास करून ग्रीन जिमची उपकरणे लावण्याचीही मागणी केली.घाणीचा रुग्णांना त्रासगरीब नवाज नगरमध्ये नाल्याच्या बाजुला महापालिकेचा दवाखाना आहे. या परिसरात घाण असल्याने परिसरातील रुग्णांना याचा फायदा होत नाही. हा दवाखाना गरीब नवाज नगरमधील मैदानात असलेल्या सभागृहात स्थानांतरीत करण्याची मागणी नागरिकांनी केली. महापौरांनी दवाखाना स्थानांतिरत करण्याचे निर्देश दिले.सोमवारी पालकमंत्र्यांचा जनसंवादमहापालिका क्षेत्रातील झोननिहाय, प्रभागनिहाय समस्या ऐकून घेण्यासाठी, महत्त्वाच्या समस्यांवर, प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे झोननिहाय जनसंवाद कार्यक्रम घेत आहेत. १० डिसेंबरला सोमवारी आसीनगर झोनमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या समस्या मांडण्याचे आवाहन यावेळी महापौरांनी केले.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाMayorमहापौर