शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
2
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 
3
केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार 
4
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तटकरेंचा खळबळजनक दावा; मात्र अजित पवार म्हणाले...
5
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
6
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
7
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: 'एक्झिट पोल'चे आकडे जाहीर, आंध्र प्रदेश, तेलंगणात भाजपाची मुसंडी
8
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
9
पंतप्रधान मोदींच्या १५५ सभा, २ हजारहून अधिक वेळा उच्चारले हे २ शब्द; विरोधकांना या ५ मुद्द्यांवर घेरलं!
10
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षातील महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा, सुप्रिया सुळेंकडे सोपवली मोठी जबाबदारी
11
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
12
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
13
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
14
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
15
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
16
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
17
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
18
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
19
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
20
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत

आयुक्तांच्या दाव्यांची महापौर करणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 10:20 PM

नागपूरमध्ये कोविडचा प्रादुर्भाव दररोज वाढत असून मृत्यूसंख्या ५०० च्या घरात पोहचली आहे. मनपा प्रशासनाकडून रुग्णांसाठी व्यवस्था असल्याचा दावा केला जात आहे. तर कोविड रुग्णांसाठी खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नाहीत, कोविड केअर सेंटरमध्ये पण रुग्णांना पाठविले जात नाही, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्दे समित्यांची स्थापना : पदाधिकारी व प्रशासनातील वाद वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरमध्ये कोविडचा प्रादुर्भाव दररोज वाढत असून मृत्यूसंख्या ५०० च्या घरात पोहचली आहे. मनपा प्रशासनाकडून रुग्णांसाठी व्यवस्था असल्याचा दावा केला जात आहे. तर कोविड रुग्णांसाठी खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नाहीत, कोविड केअर सेंटरमध्ये पण रुग्णांना पाठविले जात नाही, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दावे-प्रतिदावे विचारात घेता महापौर संदीप जोशी यांनी प्रशासनाने केलेल्या दाव्याची चौकशी करण्यासाठी विविध समित्यांची सोमवारी घोषणा केली. यातून प्रशासन व पदाधिकारी यातील वाद वाढण्याची शक्यता आहे.समित्यांमार्फत मनपाद्वारे नागपूरमध्ये कोविड-१९ च्या रुग्णांसाठी खासगी आणि शासकीय रुग्णालयांत केलेली खाटांची व्यवस्था, कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध खाटांची संख्या, हॉटेल्स आणि मनपाच्या रुग्णालयात खाटांची व्यवस्था याची पाहणी करून आपला अहवाल मंगळवारी २५ ऑगस्टला दुपारी ४ वाजता आयोजित बैठकीत सादर करतील. मनपा सभेत ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर संदीप जोशी यांनी कोविड - १९ बद्दल समन्वय करण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांची समिती गठित केली आहे. या समितीची बैठक सोमवारी मनपा मुख्यालयात पार पडली. वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई यांनी २४ खासगी रुग्णालयांत १,८७६ खाटांची व्यवस्था करण्यात आली असून सद्य:स्थितीत ५७५ बेड्स उपलब्ध असल्याचे सांगितले.मेयो, मेडिकल रुग्णालयात १२०० खाटांची व्यवस्था आहे. जीएमसीमध्ये ६०० बेड्स आहे त्यात ३४० रुग्ण भरती आहेत, आयजीएमसीमध्ये ६०० बेड्स आहेत त्यात २९५ रुग्ण भरती आहे, दोन्ही हॉस्पीटलमध्ये आॅक्सीजनची व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच त्यांनी मनपा व्दारा संचालित कोविड टेस्टिंग सेंटरची माहिती दिली.अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की, आमदार निवास, पोलिस क्वॉर्टर पाचपावली, व्हीएनआयटी होस्टेल, सिम्बॉयसीस होस्टेल आणि वनामतीमध्ये २८०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त ४,७३० खाटांची व्यवस्था रुग्णांसाठी सज्ज आहे. तसेच ३,३५६ खाटांची व्यवस्था प्रस्तावित आहे. हॉटेल्समध्येसुद्धा कोविड केअर सेंटरची परवानगी देण्यात आली आहे. प्रशासनाचे दावे आणि वर्तमान परिस्थितीमध्ये मोठी तफावत असल्याने सत्य परिस्थिती जाणण्यासाठी समित्या गठित करण्यात येत आहे. समित्या सत्य परिस्थितीची पाहणी करून आपला रिपोर्ट देतील, अशी माहिती संदीप जोशी यांनी दिली. बैठकीत आमदार प्रवीण दटके, यांच्यासह समितीतील सदस्य उपस्थित होते.अशा आहेत समित्याखासगी रुग्णालयांसाठी : उपमहापौर मनीषा कोठे यांच्या नेतृत्वात आरोग्य समिती सभापती वीरेन्द्र कुकरेजा, नगरसेवक संदीप सहारे, संजय बंगाले, दुनेश्वर पेठे व अति.आयुक्त संजय निपाणे यांच्या समितीची घोषणा केली.शासकीय रुग्णालयांसाठी : दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात सुनील अग्रवाल, प्रफुल्ल गुडधे, वैशाली नारनवरे व डॉ. भावना सोनकुसळे.कोविड टेस्ट सेंटरसाठी : वर्षा ठाकरे यांच्या नेतृत्वात दिव्या धुरडे आणि संचालक, घनकचरा व्यवस्थापन व उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार.कोविड केअर सेंटरसाठी व हॉटेलची पाहणी : स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांच्या नेतृत्वात सत्तापक्ष नेता संदीप जाधव, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, किशोर कुमेरिया, संजय महाकाळकर, विधी व सामान्य प्रशासन समिती सभापती धर्मपाल मेश्राम व उपायुक्त निर्भय जैन.आज महापौर, आमदारांची बैठकनागपूर शहरात सद्य:स्थितीत वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावासंदर्भात नवीन उपाययोजना व निर्णय घेण्यास्तव मनपा पदाधिकारी आणि आमदारांची आज मंगळवारी दुपारी १२ वाजता मनपा मुख्यालयात बैठकीचे आयोजन केले आहे.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीtukaram mundheतुकाराम मुंढे