शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

नागपुरातील अपूर्व विज्ञान मेळावा तयारीचा महापौरांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 20:32 IST

नागपूर महापालिका व असोसिएशन फॉर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान मेळाव्याचे हे २१ वे वर्ष आहे. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देणाऱ्या या विज्ञान मेळाव्याच्या तयारीचा मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांनी महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला.

ठळक मुद्दे२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महापालिका व असोसिएशन फॉर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान मेळाव्याचे हे २१ वे वर्ष आहे. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देणाऱ्या या विज्ञान मेळाव्याच्या तयारीचा मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांनी महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला.शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, कर संकलन समितीचे उपसभापती सुनील अग्रवाल, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, अपर आयुक्त राम जोशी, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, असोसिएशन फॉर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशनचे सचिव सुरेश अग्रवाल, विज्ञान मेळाव्याचे समन्वयक राजेंद्र पुसेकर, क्रीडा अधिकारी नरेश सवाईतूल, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी आदी उपस्थित होते.उत्तर अंबाझरी मार्गावरील रामदासपेठ येथील राष्ट्रभाषा भवन येथे इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसीय अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘आओ करे विज्ञान से दोस्ती’ या संकल्पनेवर आधारित या मेळाव्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी रुची निर्माण करणे हा आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेण्याचे तसेच संपूर्ण प्रदर्शन परिसरात स्वच्छता ठेवण्याचे निर्देश यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी दिले.विविध विषयांवर १०० प्रयोगअसोसिएशन फॉर रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना आनंददायी विज्ञान प्रयोग शिकविण्याच्या उद्देशाने विविध प्रयोग तयार केले जातात. अपूर्व विज्ञान मेळाव्यामध्ये इयत्ता सहावी ते बारावीतील अभ्यासक्रमातील रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित या विषयांतील १०० प्रयोग असतील. महापालिकेच्या शाळांतील २०० विद्यार्थी प्रदर्शनाला भेट देणाºयांना या प्रयोगांबाबत माहिती देतील.

टॅग्स :scienceविज्ञानNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका