महापौर दटके शेतकरी!
By Admin | Updated: September 6, 2014 03:01 IST2014-09-06T03:01:49+5:302014-09-06T03:01:49+5:30
महापालिकेचे ५१ वे नवनियुक्त महापौर प्रवीण दटके शेतकरी आहेत. वयाच्या ३४ व्या वर्षी महापौर होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे.

महापौर दटके शेतकरी!
नागपूर : महापालिकेचे ५१ वे नवनियुक्त महापौर प्रवीण दटके शेतकरी आहेत. वयाच्या ३४ व्या वर्षी महापौर होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर ते सर्वात तरुण महापौर आहेत.
महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रभाकरराव दटके यांचे ते पूत्र आहेत. प्रवीण यांनी त्यांनी पॉलिटेक्निक पदविका घेतली आहे. पत्नी गृहिणी असून त्यांना एक मुलगी आहे. दटके यांनी भाजप युवा मोर्चाचे महासचिव, शहर अध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष, मनपातील सत्तापक्ष नेते आदी पदे भूषविली आहेत. दटके तिसऱ्यांना नगरसेवक म्हणून महाल भागातून निवडून आले. यापूर्वी त्यांनी पक्ष प्रतोत, मनपाच्या शिक्षण, बांधकाम तसेच जलप्रदाय समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
मनपात अपक्षांचे गटनेते असलेले उपमहापौर मुन्ना पोकुलवार हे बांधकाम व्यवसायी आहेत. त्यांचा जन्म २४ जून १९५६ रोजी झाला. बीकॉम प्रथम वर्षापर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांना समाजसेवेची तसेच संगीताची आवड आहे. महापालिकेच अपक्ष नगरसेवकांना एकत्र करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.