शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

महापौर व स्थायी समिती अध्यक्षांनी केली जळीत हॉस्पिटलची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:39 IST

श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स चौकातील निर्माणाधीन हॉस्टिलच्या इमारतीला बुधवारी दुपारीच्या सुमारास आग लागली. यात १२ कामगार गुदमल्याने बेशुद्ध पडल्याची माहिती मिळताच महापौर नंदा जिचकार, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष आग लागलेल्या जागेची पाहणी केली.

ठळक मुद्देगॅस वेल्डींगसह अनेक कामे होती सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स चौकातील निर्माणाधीन हॉस्टिलच्या इमारतीला बुधवारी दुपारीच्या सुमारास आग लागली. यात १२ कामगार गुदमल्याने बेशुद्ध पडल्याची माहिती मिळताच महापौर नंदा जिचकार, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष आग लागलेल्या जागेची पाहणी केली. प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी महापौरांना आगीविषयी संपूर्ण माहिती देत आग नियंत्रणात आल्याचे सांगितले. किंग्ज वे मार्गावर किंग्ज वे हॉस्पीटलच्या इमारतीचे कार्य सुरू आहे. याच इमारतीचा मागील भाग परवाना ट्रस्टचा आहे. त्यांचे ऑडिटोरियमचे कार्य सुरू होते. येते गॅस वेल्डींगसह अनेक कामे सुरू होते. यामुळे आग लागल्याची माहिती दिली.निमार्णाधीन इमारतीमध्ये अग्निशमन नियमाप्रमाणे पाईप, शॉवर पाईपचे काम झालेले होते. मात्र पाण्याच्या पाईपला जोडले नव्हते.आगीची घटना ही मोठी आहे. इमारत निमार्णाधीन असल्याने आणि तेथे केवळ मजूर असल्याने मोठी दुर्घटना टळली. मजुरांनीही वेळीच प्रसंगावधान दाखवून आपले जीव वाचवले. याचदरम्यान अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळविता आले. ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी धूर, उष्णता आणि गुदरमण्यासारखी परिस्थिती असतानाही अग्निशमन विभागाचे जवान तेथे आत शिरून परिस्थितीवर नियंत्रण मिळवित आहे. जीवावर उदार होऊन सेवा करणाऱ्या अग्निशमन विभागातील सर्व अधिकारी, स्थानाधिकारी व जवानांचे कार्य कौतुकास आणि अभिनंदनास पात्र आहे. असल्याचे महापौर नंदा जिचकार यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.पाच मार्ग असल्याने कामगार सुखरुपनिर्माणाधीन हॉस्पिटल व ऑडिटोरियमला बाहेर पडण्यासाठी पाच मार्ग असल्याने आग लागल्यानंतर कामगारांना बाहेर पडता आहे. यामुळे मोठी दुर्घटना टळली. बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग असता तर कामगार आतमध्ये अडकले असते. सुदैवाने पाच मार्गामुळे ही अशी घटना घडली नाही.

टॅग्स :fireआगhospitalहॉस्पिटल