शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

नागपुरात मेयोचा मदतीला एम्स, आरोग्य विभाग, आयुर्वेदिक डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 11:14 IST

जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी एम्स, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय व सी.जी.एच.एस. मधील तब्बल ४६ डॉक्टरांची सेवा मेयोमध्ये संलग्न केली.

ठळक मुद्दे४६ डॉक्टरांची सेवा केली सलग्नकोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर असाही निर्णय

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा वाढत्या रुग्ण व मृतांच्या संख्येने आरोग्य यंत्रणेसमोर एक मोठे आवाहन उभे राहिले आहे. यात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) अल्प मनुष्यबळामुळे कोरोनाचे आवाहन पेलणे कठीण झाले आहे. याची दखल जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी घेऊन एम्स, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय व सी.जी.एच.एस. मधील तब्बल ४६ डॉक्टरांची सेवा मेयोमध्ये संलग्न केली. आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधात्मक कायदा अंतर्गत प्राप्त अधिकारातून हे आदेश काढण्यात आले आहे.

मेयो रुग्णालयात केवळ नागपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भासह आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. रुग्णालयातील ७५० खाटांच्या तुलनेत डॉक्टरांसह परिचारिका, तंत्रज्ञ, अटेन्डंट व चतुर्थ कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नाही. सध्या रुग्णालयात १५३ वरीष्ठ डॉक्टर व १८३ निवासी डॉक्टर आहेत. परिचारिकांच्या ४७८ जागा मंजूर असताना ८२ जागा रिक्त आहेत. चतुर्थ कर्मचाऱ्यांच्या ३२१ पदांमधील १३१ पदे रिक्त आहेत. यातच ६०० खाटांचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आल्याने व २०० खाटांचे आयसीयू असल्याने मोठे मनुष्यबळ या हॉस्पिटलमध्ये लागत आहे. शिवाय दर १४ दिवसानंतर कोविड रुग्णांना सेवा देणाऱ्यांना सात दिवसांसाठी क्वारंटाइन केली जात असल्याने व रुग्णांच्या संपर्कात येऊन पॉझिटिव्ह येणाऱ्यांना होम आयसोलेशन करावे लागत असल्याने मनुष्यबळाच्या कमीला घेऊन रुग्णालय प्रशासनावर कामाचा ताण वाढला आहे.

प्राप्त माहितीनुसार, याची दखल जिल्हाधिकारी ठाकरे यांनी घेतली. त्यांनी जिल्हा आरोग्य विभागांतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गंत आर.बी.एस. के. वैद्यकीय अधिकारी, अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्था (एम्स), शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व सी.जी.एच.एस.मधील ४६ डॉक्टरांची सेवा मेयो येथे संलग्न करण्याचे गुरुवारी आदेश काढले. -एम्सच्या विभाग प्रमुखांकडे मेयोच्या मेडिसीनची जबाबदारीएम्सच्या मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. पी. पी. जोशी यांची मेयोच्या मेडिसीन विभागाचे प्रमुख म्हणून नेमणूक केली आहे. तुर्तास ते रुजू झालेले नाहीत. मात्र एम्स मेडिसीन विभागातील व बधिरीकरण विभागातील प्रत्येकी एक डॉक्टर रूजू झाले आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सक विभागातील सर्वाधिक १९ डॉक्टरजिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार ४६ डॉक्टरांमध्ये शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील सात डॉक्टर, समुदाय आरोग्य अधिकारी अंतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागातील १८ डॉक्टर, आर.बी.एस.क. वैद्यकीय अधिकारी अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील १९ डॉक्टर व सीजीएचएसमधील दोन डॉक्टरांचा समावेश आहे. यांना तत्काळ मेयोमध्ये रुजू होण्याच्या स्पष्ट सूचना आहेत. रुजू झाल्याचा अहवाल मेयोच्या अधिष्ठात्यांना जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावयाचा आहे. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस