मायावती यांची आज कस्तूरचंद पार्कवर जाहीर सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:03 IST2019-04-05T00:02:28+5:302019-04-05T00:03:16+5:30

बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) विदर्भातील सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ बसपाच्या अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची जाहीर सभा उद्या ५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता कस्तूरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आली आहे.

Mayawati's meeting today at Kasturchand Park | मायावती यांची आज कस्तूरचंद पार्कवर जाहीर सभा

मायावती यांची आज कस्तूरचंद पार्कवर जाहीर सभा

ठळक मुद्देविदर्भातील सर्व बसपा उमेदवारांचा प्रचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) विदर्भातील सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ बसपाच्या अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची जाहीर सभा उद्या ५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता कस्तूरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आली आहे.
मायावती यांची ही विदर्भार्तीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा आहे. एकूणच त्या लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील प्रचाराचा श्रीगणेश नागपूर येथून करतील. बसपाचे विदर्भातील उमेदवार मोहम्मद जमाल (नागपूर), डॉ. विजया नंदूरकर (भंडारा-गोंदिया), हरिश्चंद्र मंगाम (गडचिरोली-चिमूर), अरुण किनवटकर (यवतमाळ -वाशीम), डॉ. शैलेश कुमार अग्रवाल (वर्धा), सुशील वासनिक (चंद्रपूर), अरुण वानखेडे (अमरावती), अब्दुल हफीज (बुलडाणा), आणि बी. सी. कांबळे (अकोला) या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांसह या सभेला बसपाचे राष्ट्रीय महासचिव खा. डॉ. अशोक सिद्धार्थ, प्रदेश प्रभारी प्रमोद रैना, प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे, संदीप ताजने, कृष्णा बेले प्रामुख्याने उपस्थित राहतील.

Web Title: Mayawati's meeting today at Kasturchand Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.