शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मायावती नागपुरातून फुंकणार लोकसभा निवडणुकीचे रणशिंग, डिसेंबरमध्ये जाहीर सभा

By आनंद डेकाटे | Updated: November 10, 2023 16:09 IST

आकाश आनंद करताहेत वातावरणनिर्मिती

नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या डिसेंबरमध्ये बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांची जाहीर सभा नागपुरात होणार आहे. यासाठी बसपाने वातावारण निर्मिती सुद्धा सुरु केली आहे. बसपाचे राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद यासाठी नागपुरात तळ ठोकून बसणार आहेत.

मायावती यांची सभा ही निवडणुकीचे रणशिंग फुंकणारी असल्याने बसपा या सभेसाठी तयारीला लागली आहे. यासाठी आकाश आनंदहे स्वत: महाराष्ट्रात चार सभा घेणार आहेत. पहिली सभा ही येत्या १७ नोव्हेंबर रोजी नागपुरात होईल. २३ नोव्हेंबर रोजी दुसरी सभा पुणे २९ नोव्हेंबरला औरंगाबाद आणि ६ डिसेंबररोजी मुंबईला सभा होईल. सध्या मायावती या मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान व तेलंगाना येथे होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत व्यस्त आहेत. परंतु २०२४ च्या लोकसभा व महाराष्ट्रातील विधानसभा नजरेसमोर ठेवून त्यांनी या सभांची आखणी केली आहे. आनंद आकाश यांच्या सभेच्या नियोजनासाठी स्थानिक बसपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक बैठक नुकतीच पार पडली.

यात केंद्रीय समन्वयक नितीन सिंग, महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी व विदर्भाचे इन्चार्ज ऍड सुनील डोंगरे तसेच महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष एड संदीप ताजने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेशचे नागोराव जयकर, नानाजी देवगडे, पृथ्वीराज शेंडे, विजयकुमार डहाट, मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, जिल्हा प्रभारी एड राहुल सोनटक्के, जिल्हाध्यक्ष ओपुल तामगडे प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :mayawatiमायावतीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीnagpurनागपूर