गणित अध्यापक मंडळाची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:09 IST2021-07-31T04:09:03+5:302021-07-31T04:09:03+5:30
मांढळ : वग (ता. कुही) येथील बालाजी हायस्कूलच्या सभागृहात गुरुवारी (दि. २९) कुही तालुका गणित अध्यापक मंडळाच्या सदस्यांची कार्यशाळा ...

गणित अध्यापक मंडळाची कार्यशाळा
मांढळ : वग (ता. कुही) येथील बालाजी हायस्कूलच्या सभागृहात गुरुवारी (दि. २९) कुही तालुका गणित अध्यापक मंडळाच्या सदस्यांची कार्यशाळा आयाेजित करण्यात आली हाेती. यावेळी गणिताच्या शिक्षकांनी गणित विषयात अद्ययावत असणे, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.
गटशिक्षणाधिकारी शारदा किनारकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी नागपूर जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पिंपरे होते; तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक विनय गजभिये, केशव डेंगे, सज्जन पाटील, मधुकर राऊत, विजय पुडके उपस्थित होते. नरेंद्र पिंपरे यांनी ‘महाराष्ट्र राज्य शासनाच्या सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी’, विजय पुडके यांनी ‘९ ऑगस्टला संपन्न होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात गुणभारांश, भूमिती, बुद्धिमत्ता चाचणी’, केशव डेंगे यांनी ‘अपूर्णांक, गणितातील गमती-जमती’ यांवर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचा समाराेप सज्जन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. समाराेपीय कार्यक्रमाला अतिथी म्हणून प्रदीप घुमडवार उपस्थित हाेते. अशा प्रकारची कार्यशाळा तीन ते चार दिवस घेण्याची प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केली. कुही तालुका गणित अध्यापक मंडळाच्या कार्यकारिणीची जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी विजय पुडके सिर्सी, उपाध्यक्षपदी, संतोष बावनकुळे तितूर, सचिव कृष्णकैलास दहीकर तारणा यांची निवड करण्यात आली. संचालन कृष्णकैलास दहीकर यांनी केले; तर प्रभाकर गंथाडे यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी वग येथील शिक्षक चंद्रकांत दडमल, जितेंद्र निनावे, यशवंत चव्हाण, मधुकर पराते, बादल देशमुख यांनी सहकार्य केले. कार्यशाळेला कुही तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील गणिताच्या ९६ शिक्षकांची उपस्थिती होती.