Master Blaster Sachin Tendulkar today in Nagpur | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज नागपुरात
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज नागपुरात

ठळक मुद्दे‘खेलो नागपूर खेलो’ स्पर्धेचे करणार उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्रिकेट जगतात मास्टर ब्लास्टर म्हणून प्रसिद्ध असलेला सचिन तेंडुलकर आज नागपुरात येत आहे. खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत ‘खेलो नागपूर खेलो’ स्पर्धेचे उद्घाटन तेंडुलकर याच्या हस्ते करण्यात येणार आहे. १२ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता यशवंत स्टेडियमवर होणाऱ्या या उद्घाटकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर नंदा जिचकार प्रमुख अतिथी राहतील.
१२ जानेवारी ते २४ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या खासदार क्रीडा महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

 


Web Title: Master Blaster Sachin Tendulkar today in Nagpur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.