शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरजवळ स्फोटक कंपनीत भीषण स्फोट, १८ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 04:31 IST

२३ कामगार जखमी : काटोल हादरले, मृतदेह शोधण्यासाठी नातेवाइकांची धडपड

योगेश पांडे / जितेंद्र ढवळेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील ‘एसबीएल एनर्जी’ या स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीत रविवारी सकाळी भीषण स्फोट होऊन १८ कामगारांचा मृत्यू झाला, तर २३ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींमध्ये सर्वाधिक महिला आहेत. डेटोनेटर्स  बनविणाऱ्या या कंपनीत ‘नोनल क्रिम्पिंग’ युनिटमध्ये ‘डेटोनेटर्स सेल’च्या पॅकिंगचे काम सुरू होते. सकाळी सव्वासातला तेथे स्फोट झाला आणि आगीचा भडका उडाला. या युनिटमधील ४० कामगारांपेकी १८ कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य युनिटमधील कामगार जखमी झाले. 

स्फोटाचे कारण अस्पष्टच, चौकशी सुरू स्फोट नेमका कोणत्या कारणांमुळे झाला हे ‘पेसो’ तसेच राज्य शासनाच्या औद्योगिक सुरक्षा विभागाच्या तपासणीतून समोर येईल. घटनास्थळाची फॉरेन्सिक चौकशीदेखील सुरू आहे व पथकदेखील तेथे पोहोचले. एसडीआरएफ व अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने येत मदतकार्याला सुरुवात केली. या स्फोटाचे नेमके कारण अस्पष्ट असून चौकशी सुरू आहे. काही मृतकांची ओळख डीएनए चाचणीनंतरच पटू शकेल, अशी माहिती पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.

नातेवाइकांचा आक्रोश, नाव जाणून घेण्यासाठी धडपडस्फोटात नेमके कोण जखमी झाले आहे व कोण वाचले आहे, याची माहितीच कळत नव्हती. आपल्या जीवलगांची काय स्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी नातेवाइकांची धडपड सुरू होती. जखमींची यादी जारी करण्यात आली. मात्र, मृतकांमध्ये कुणाचा समावेश आहे हे दुपारपर्यंत कळले नव्हते. अधिकृत यादी न आल्याने कामगारांचे नातेवाईक भर उन्हात कंपनीसमोर उभे असल्याचे दिसून आले.

कंपनीचा दावा, कुठलेही सक्रिय उत्पादन सुरू नव्हतेया प्रकरणात ‘एसबीएल’ कंपनीकडून पत्रक जारी करण्यात आले आहे. जेथे स्फोट झाला तेथे कुठलेही सक्रिय उत्पादन कार्य सुरू नव्हते, असा दावा कंपनीने केला आहे. स्फोटाचे नेमके कारण काय आहे, याचा शोध सुरू आहे. जखमींना चांगले उपचार मिळावे यावर आमचा भर असून, मृतक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक आर्थिक मदत करण्यात येईल. अंतर्गत चौकशी सुरू केली असून, त्याच्या निष्कर्षांच्या आधारे पुढील पावले उचलण्यात येतील, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

ही आहेत मृतकांची नावेपायल गजभिये,  मीना उईके, प्रतिभा वाळके,  दुर्गा गायकवाड,  शोभा तापसे, अनुसया पाटील, सुनीता सलामे, ज्योत्स्ना शेंद्रे, मंगेश्री येस्कर, संगीता पंचांभाई, गोपी किशोर कोवे,  सुनंदा चिंचखेडे,  सविता काळमेघ,  गणेश टोंगे, राजेंद्र कुळमेथे,  प्रेमदास बागडे.

सात लाखांची मदत, सखोल चौकशी होणार

मृतांच्या वारसांना केंद्र शासनाकडून दोन लाख रुपये व जखमींना ५० हजारांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तर राज्य शासनाकडूनदेखील पाच लाखांची मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले. हा स्फोट दुर्दैवी आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रति मी संवेदना व्यक्त करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Massive Explosion at Nagpur Explosives Factory Kills 18, Injures Many

Web Summary : A devastating explosion at an explosives factory near Nagpur claimed 18 lives and injured 23. The blast occurred in the detonator unit during packaging. Investigations are underway to determine the cause. Financial assistance has been announced for the victims' families by both central and state governments.
टॅग्स :Blastस्फोटnagpurनागपूर