१६१ नागरिकांना दंड करून दिले मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:36 IST2020-12-17T04:36:39+5:302020-12-17T04:36:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी बुधवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १६१ नागरिकांविरुद्ध कारवाई ...

Masks fined 161 citizens | १६१ नागरिकांना दंड करून दिले मास्क

१६१ नागरिकांना दंड करून दिले मास्क

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी बुधवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १६१ नागरिकांविरुद्ध कारवाई करून ८० हजार ५०० रुपयाचा दंड वसूल केला. या सर्वांना मास्क देण्यात आले.

उपद्रव शोध पथकाद्वारे लक्ष्मीनगर झोनअंतर्गत २१, धरमपेठ ३०, हनुमाननगर १८, धंतोली १२, नेहरूनगर १५, गांधीबाग ९, सतरंजीपुरा ११, लकडगंज ७, आशीनगर २०, मंगळवारी १६ आणि मनपा मुख्यालयातील २ जणांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत १८,६३४ बेजबाबदार नागरिकांकडून ९३ लाख १७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Web Title: Masks fined 161 citizens