१२८ नागरिकांना दंड करून दिले मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:08 IST2020-12-22T04:08:34+5:302020-12-22T04:08:34+5:30

मनपाची आतापर्यंत २४,७३८ व्यक्तींविरुद्ध कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सोमवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या ...

Masks fined 128 citizens | १२८ नागरिकांना दंड करून दिले मास्क

१२८ नागरिकांना दंड करून दिले मास्क

मनपाची आतापर्यंत २४,७३८ व्यक्तींविरुद्ध कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सोमवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १२८ नागरिकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून ६४ हजार रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी २४,७३८ नागरिकांविरुद्ध कारवाई करून आतापर्यंत १ कोटी ७ लाख २८ हजराचा दंड वसूल केला आहे.

उपद्रव शोध पथकाद्वारे लक्ष्मीनगर झोनअंतर्गत १३, धरमपेठ १६, हनुमाननगर १८ धंतोली १२, नेहरूनगर १०, गांधीबाग ८, सतरंजीपुरा ७, लकडगंज ६, आशीनगर १६, मंगळवारी २० आणि मनपा मुख्यालयातील २ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत ५०० रुपये याप्रमाणे १९,२६८ नागरिकांकडून ९६ लाख ३४ हजार वसूल करण्यात आले आहे.

Web Title: Masks fined 128 citizens