विवाहित महिलेवर मित्राने केला बलात्कार

By Admin | Updated: October 27, 2015 03:33 IST2015-10-27T03:33:37+5:302015-10-27T03:33:37+5:30

विवाहबाह्य संबंधाचे परिणाम कसे भयावह ठरू शकतात, त्याचा प्रत्यय सोनेगावमधील एका प्रकरणातून आला आहे.

Married woman raped by friend | विवाहित महिलेवर मित्राने केला बलात्कार

विवाहित महिलेवर मित्राने केला बलात्कार

नागपूर : विवाहबाह्य संबंधाचे परिणाम कसे भयावह ठरू शकतात, त्याचा प्रत्यय सोनेगावमधील एका प्रकरणातून आला आहे. तब्बल दीड वर्षांपासून बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा त्रास सहन करणाऱ्या नराधमाविरुद्ध पीडित महिलेने तक्रार केल्यानंतर हे खळबळजनक प्रकरण उजेडात आले. सोनेगाव पोलिसांनी याप्रकरणी रुमिल शर्मा (वय २९, रा. वर्धमाननगर) या नराधमाला अटक केली.
आरोपी शर्मा वर्धमाननगरात कथित जॉब प्लेसमेंटची दुकानदारी करतो. बड्या कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तो बेरोजगारांना आपल्या जाळ्यात ओढतो. सुस्वरूप तरुणींना तो बॉलिवूडमध्ये काम मिळवून देण्याचेही स्वप्न दाखवतो. अशाच प्रकारच्या स्वप्नाला बळी पडलेली पीडित महिला (वय २९) सोनेगावमधील रहिवासी आहे. गेल्या वर्षी ती शर्माच्या संपर्कात आली. चांगला ‘जॉब’ मिळवून देण्याचे शर्माने आश्वासन दिल्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली. महिलेचा पती एका मोठ्या कंपनीत नागपूरबाहेर नोकरी करतो. त्यामुळे ती आणि शर्मा दोघेही निरंतर आॅनलाईन संपर्कात राहायचे.
नंतर आरोपी शर्माचे तिच्याकडे जाणे-येणेही सुरू झाले. १५ जुलै २०१४ रोजी त्याने तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. नंतर त्यांच्यात वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापित होऊ लागले. महिलेने आपल्या मर्यादा ओलांडल्याने आरोपी शर्माने एका दिवशी शरीरसंबंधाची व्हिडीओ क्लिप तयार केली. मोबाईलमध्ये फोटोही काढले. त्यानंतर त्याच्या मनात येईल तेव्हा तो तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी करू लागला. विवाहित असल्यामुळे ती त्याच्याकडे आपल्या अडचणी सांगायची. मात्र, तिने नकार दिला किंवा कारण सांगितल्यास तो तिला व्हिडीओ क्लिप आणि फोटो इंटरनेटवर टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करू लागला.
पती असतानाच...
काही दिवसांपूर्वी पीडित महिलेचा पती नागपुरात परत आला. अशात २४ आॅक्टोबरला दुपारी १२.३० वाजता आरोपी शर्मा तिच्याकडे आला. पती कोणत्याही वेळेला घरी येऊ शकतो, असे सांगूनही त्याने तिच्यावर पाशवी बलात्कार केला. अर्ध्या तासानंतर तिला धमकी देऊन तो निघून गेला. काही वेळेनंतर पती घरी परतला. तिची अवस्था पाहून त्याला शंका आली. तिचे मंगळसूत्रही दिसत नसल्याने त्याने खोदून खोदून विचारले असता महिलेने या प्रकरणाची माहिती दिली. आरोपी ब्लॅकमेल करीत असल्यामुळे मंगळसूत्र गहाण ठेवून त्याला ५० हजार दिल्याचेही सांगितले.

Web Title: Married woman raped by friend