पाण्याच्या टाक्यात पडून विवाहितेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:13 IST2021-02-06T04:13:03+5:302021-02-06T04:13:03+5:30
पारशिवनी : अचानक फिट आल्याने विवाहित महिला घरासमाेरील पाण्याच्या टाक्यात पडली. त्यात नाकाताेंडात पाणी गेल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

पाण्याच्या टाक्यात पडून विवाहितेचा मृत्यू
पारशिवनी : अचानक फिट आल्याने विवाहित महिला घरासमाेरील पाण्याच्या टाक्यात पडली. त्यात नाकाताेंडात पाणी गेल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा बखारी येथे बुधवारी (दि.३) दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली.
वैशाली साेनूजी डाेईफाेडे (२८, रा. उत्थाननगर, गाेरेवाडा नागपूर) असे मृत महिलेचे नाव आहे. वैशाली घराच्या अंगणात उभी असताना अचानक तिला फिट आल्याने ती पाण्याच्या टाक्यात पडली. ही बाब ध्यानात येताच तिला पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान वैशालीचा मृत्यू झाला. याप्रकरणी दिवाकर बळीराम भाेयर (५९, रा. पिपळा) यांच्या तक्रारीवरून पारशिवनी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक नागुलवार करीत आहेत.