लग्नाच्या सात महिन्यातच विवाहितेचे आयुष्य उद्ध्वस्त

By Admin | Updated: August 24, 2016 02:57 IST2016-08-24T02:57:28+5:302016-08-24T02:57:28+5:30

रोड रोमियोसोबत लग्न करून ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ चे काम करणारी एक युवती मृत्यूशी संघर्ष करीत आहे.

Married in the seven months of marriage, | लग्नाच्या सात महिन्यातच विवाहितेचे आयुष्य उद्ध्वस्त

लग्नाच्या सात महिन्यातच विवाहितेचे आयुष्य उद्ध्वस्त

सासरच्या छळाला कंटाळून केला आत्महत्येचा प्रयत्न
जगदीश जोशी नागपूर
रोड रोमियोसोबत लग्न करून ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ चे काम करणारी एक युवती मृत्यूशी संघर्ष करीत आहे. वर्धमाननगरातील एका रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. सासरच्या त्रासाला कंटाळून तिने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु तो अपयशी ठरला, यात तिचे ‘ब्रेन डेथ’ झाले.
पीडित विवाहिता २३ वर्षाची असून, डॉली असे तिचे नाव आहे. गणेशपेठ येथील व्यापारी सेवेंद्र बैरी यांची ती मुलगी आहे. डॉली इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करीत होती. तिची खामला येथील नितीन मीरचंदानी याच्यासोबत ओळख झाली. त्याने स्वत:ला ट्रान्सपोर्ट व्यवसायी सांगितले. नितीनने तिला लग्नाची मागणी घातली. वडिलांचा विरोध असतानाही, मुलीच्या आग्रहास्तव त्यांनी डॉलीचे धुमधडाक्यात लग्न करून दिले. लग्नाच्या एका महिन्यानंतरच नितीनच्या घरच्यांकडून तिला त्रास देणे सुरू झाले. डॉलीला वारंवार पैशाची मागणी करू लागले. नितीन बेरोजगार असल्यामुळे डॉलीच्या घरच्यांनी त्याला पाच लाख रुपये देऊन व्यवसाय करण्यासाठी मदत केली. अशातच डॉली गर्भवती राहिली. या अवस्थेत नितीनने तिला बेदम मारहाण केली. त्यामुळे तिचा गर्भपातही झाला. २१ जुलैला डॉलीचा जन्मदिवस होता. तिची आई, बहीण व भाऊ तिला शुभेच्छा देण्यासाठी तिच्या घरी गेले. त्याच दिवशी रात्री नितीन उशिरा घरी आला. डॉलीला शिवीगाळ करून मारपीट केली. तिच्या घरच्यांसमोर नितीनचा हा प्रकार बघून डॉलीच्या घरचे तिला घरी घेऊन आले. २५ जुलैला डॉलीने आपल्या आईच्या घरी गळफास घेतला.
घरच्यांनी तिला मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारात सुधारणा नसल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिचा ‘ब्रेन डेथ’ झाल्याचे सांगितले. तिच्या उपचारात माहेरच्यांचा १० लाखावर खर्च झाला आहे. नितीनच्या विरोधात अंबाझरी ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. त्याचबरोबर त्याने इंदोरच्या एका युवतीसोबत लग्न केले असल्याची माहिती आहे.

Web Title: Married in the seven months of marriage,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.