शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

नवऱ्याच्या अनैतिक संबंधामुळे विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 12:01 AM

बाहेरख्याली नवऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

ठळक मुद्देव्यथा लिहून गळफास लावला : हुडकेश्वरमध्ये गुन्हा दाखल, नवरोबा गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाहेरख्याली नवऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. जयश्री विक्रम नारनवरे (वय ३०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिच्या मृत्यूला तिचा नवराच जबाबदार असल्याची तक्रार जयश्रीच्या आईने नोंदविल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी विक्रम नारनवरेला अटक केली.आरोपी विक्रम नारनवरेचे जयश्रीसोबत २०१५ मध्ये लग्न झाले. त्याच्याकडे एका मोबाईल कंपनीच्या सीमकार्डची एजन्सी असून, शताब्दी चौकात त्याचे कार्यालय आहे. विक्रमचे नातेवाईक प्रॉपर्टी डीलिंगसह अन्य काही व्यवसाय करतात. काही महिन्यांपासून विक्रमचे अनैतिक संबंध असल्याचा संशय जयश्रीला होता. त्यामुळे या दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचा. विक्रम तिला मारहाण करायचा. टोचून बोलायचा. या प्रकारामुळे जयश्री अस्वस्थ राहायची. माहेरच्या मंडळींना या दोघातील वादाची कल्पना होती. त्यांच्यात वारंवार वाद होत असल्यामुळे विक्रमने चार महिन्यांपूर्वी वडिलांचे घर सोडून हुडकेश्वरमधील महालक्ष्मीनगरात भाड्याचे घर घेतले होते. तेथे हे दोघेच राहत होते. नेहमीप्रमाणे विक्रम आज सकाळी घराबाहेर गेला. दुपारी १ च्या सुमारास तो परत आला असता त्याला जयश्री सिलींग फॅनला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली. त्याने आरडाओरड करून शेजाऱ्यांना गोळा केले. नातेवाईकांनाही कळविले. जयश्रीला खाली उतरवून मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती कळाल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी जयश्रीच्या घरी जाऊन तिच्या रूमची झडती घेतली असता एक सुसाईड नोट मिळाली. विक्रमचे दुसऱ्या तरुणीसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे आणि त्याच्याकडून होणारा छळ असह्य झाल्यामुळे आत्महत्या करीत असल्याने जयश्रीने या चिठ्ठीत लिहून ठेवले आहे, असे हुडकेश्वरचे ठाणेदार संदीप भोसले यांनी सांगितले. या चिठ्ठीमुळेच प्रारंभी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.जयश्रीच्या आईची तक्रारमुलीच्या मृत्यूचे वृत्त कळताच जयश्रीच्या माहेरची मंडळी शोकसंतप्त झाली. तिला फाशी देऊन मारले आणि आत्महत्येचा दिखावा करण्यात येत असल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी लावला. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलीस लगेच घटनास्थळी पोहचले. तेथे जयश्रीने लिहून ठेवलेली सुसाईड नोट पाहून हे प्रकरण आत्महत्येचेच असल्याचे पोलिसांनी जयश्रीच्या माहेरच्यांना पटवून दिले. दरम्यान, आरोपी विक्रम जयश्रीला माहेरून हुंड्याची रक्कम आणावी म्हणून छळत होता. त्याचे दुसरीकडे अनैतिक संबंध असल्यामुळे तो तिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा. या छळाला कंटाळूनच जयश्रीने आत्महत्या केली. तिच्या मृत्यूला विक्रम नारनवरेच कारणीभूत असल्याची तक्रार जयश्रीची आई रेखा दुरुतकर यांनी हुडकेश्वर ठाण्यात नोंदवली. त्यावरून पोलिसांनी कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करून विक्रमलाअटक केली.

टॅग्स :Suicideआत्महत्या