विदेशात सेटल होण्याचे आमिष दाखवून केले लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 09:49 PM2021-05-15T21:49:17+5:302021-05-15T21:50:55+5:30

fraud marriage जगातील २५ देशात आपले नेटवर्क असून लग्न केल्यानंतर आपण विदेशात सेटल होऊ, असे आमिष दाखवून एका आरोपीने महिलेशी लग्न केले. शरीरसंबंधाच्या नावाखाली तो विकृत चाळे करून तिचा छळ करू लागला. तो असह्य झाल्याने महिलेने सोनेगाव पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

The marriage was done by showing the lure of settling abroad | विदेशात सेटल होण्याचे आमिष दाखवून केले लग्न

विदेशात सेटल होण्याचे आमिष दाखवून केले लग्न

Next
ठळक मुद्देपत्नीवर अनैसर्गिक अत्याचार : मारहाण करून छळ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जगातील २५ देशात आपले नेटवर्क असून लग्न केल्यानंतर आपण विदेशात सेटल होऊ, असे आमिष दाखवून एका आरोपीने महिलेशी लग्न केले. शरीरसंबंधाच्या नावाखाली तो विकृत चाळे करून तिचा छळ करू लागला. तो असह्य झाल्याने महिलेने सोनेगाव पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

सक्षम शंकरराव मेश्राम असे आरोपीचे नाव आहे. तक्रार करणारी महिला वर्धा मार्गावर राहते. ती तिने स्थापन केलेल्या महिला अत्याचारविरोधी संघटनेची अध्यक्ष आहे.

आर्थिक अवस्था चांगली असलेल्या या महिलेकडे आरोपी मेश्राम तीन वर्षांपासून सतत रूम किरायाने मागण्याच्या बहाण्याने जात होता. तो स्वतःला भिक्खू म्हणून घ्यायचा. त्याची वेशभूषाही तशीच असायची. गेल्या वर्षी महिलेने त्याला आपले घर भाड्याने दिले. त्यानंतर त्याने तिला प्रपोज केले. यावेळी त्याने तिला आपले २५ देशात नेटवर्क असून लग्न झाल्यानंतर विदेशात सेटल होऊ, असे आमिष दाखवले होते. त्याला बळी पडून महिलेने त्याच्याशी लग्न केले. लग्न केल्यानंतर तो अन्य महिलांच्या सलग संपर्कात असल्याचे तिच्या लक्षात आले. एवढेच नव्हे तर त्यांची विकृतीही तिच्या पुढे आली. शरीरसंबंधांच्या नावाखाली तो नको तसे कृत्य करत होता. विरोध केल्यास तो महिलेला मारहाण करायचा. मोबाइलमध्ये पॉर्न फिल्म दाखवून तसे करण्याचा हट्ट धरायचा आणि मोबाइलमध्ये व्हिडीओसुद्धा बनवायचा. काही दिवसांपूर्वी त्याने असाच प्रकार केला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपी मेश्रामने तिला बेदम मारहाण केली. ती बेशुद्धावस्थेत असताना तिच्या कपाटातील २५ हजार रुपये तसेच सोन्याची अंगठी चोरून नेली. दरम्यान, त्याच्याकडून घात होऊ शकतो, हे लक्षात आल्यामुळे महिलेने शुक्रवारी सोनेगाव पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध मारहाण करून अनैसर्गिक अत्याचार करत असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी कलम ३७७, ४९८ अन्वये गुन्हा दाखल केला.

आरोपी गजाआड

सोनेगाव पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी सक्षम मेश्रामला अटक केली. पुढील तपास सुरू आहे

महिलेला जबर मानसिक धक्का

या प्रकरणातील पीडित महिला गेल्या पाच वर्षांपासून महिलांच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवते. मात्र, तिच्यावर स्वतःच आता असा अत्याचार झाल्यामुळे ती मानसिकदृष्ट्यापुरती कोलमडली आहे.

Web Title: The marriage was done by showing the lure of settling abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.