शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

नागपुरातील बाजारपेठा १०० टक्के बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:54 IST

वॉलमार्ट-फ्लिपकार्ट कराराला केंद्र सरकारने परवानगी देऊ नये आणि रिटेलमध्ये विदेशी गुंतवणुकीचा विरोध करताना देशातील सात कोटी रिटेल व्यापाऱ्यांची शिखर संघटना कन्फेडरेशन आॅफ इंडिया ट्रेडर्सने (कॅट) पुकारलेला शुक्रवार, २८ सप्टेंबरचा भारत बंद व्यापाऱ्यांच्या एकजुटतेमुळे १०० टक्के यशस्वी झाला. नागपुरातील सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदविला. बाजापेठांमध्ये शुकशुकाट होता. शुक्रवारी कोट्यवधींचा व्यवसाय ठप्प झाला. त्यामुळे सरकारला महसूलाचा फटका बसला.

ठळक मुद्देरिटेलमध्ये विदेशी गुंतवणुकीचा विरोध : बाजारपेठांमध्ये शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वॉलमार्ट-फ्लिपकार्ट कराराला केंद्र सरकारने परवानगी देऊ नये आणि रिटेलमध्ये विदेशी गुंतवणुकीचा विरोध करताना देशातील सात कोटी रिटेल व्यापाऱ्यांची शिखर संघटना कन्फेडरेशन आॅफ इंडिया ट्रेडर्सने (कॅट) पुकारलेला शुक्रवार, २८ सप्टेंबरचा भारत बंद व्यापाऱ्यांच्या एकजुटतेमुळे १०० टक्के यशस्वी झाला. नागपुरातील सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदविला. बाजापेठांमध्ये शुकशुकाट होता. शुक्रवारी कोट्यवधींचा व्यवसाय ठप्प झाला. त्यामुळे सरकारला महसूलाचा फटका बसला.विदर्भातील १०० पेक्षा जास्त व्यापारी संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स (एनव्हीसीसी) आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनात हजारो व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या व्यापारीविरोधी धोरणाचा निषेध केला. हजारो व्यापाऱ्यांनी रॅली काढून पोस्टर वाटप केले आणि व्यापारी एकजुटतेचे आवाहन केले. सकाळी इतवारी शहीद चौकात दुर्गादेवीच्या मंदिरात महाआरती करून आंदोलनाला प्रारंभ झाला. व्यापाऱ्यांनी रॅली काढून सर्व बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. व्यापारीही मर्जीने रॅलीत सहभागी झाले. आंदोलनात इतवारी किराणा बाजार, धान्य बाजार, कापड बाजार, लोखंड बाजार, महाल बाजापेठ, सीताबर्डी मुख्य बाजारपेठ, सक्करदरा बाजार, खामला बाजारपेठ, गोलबाजार, गारमेंट बाजारपेठ, सोना-चांदी बाजार यासह इतर बाजारपेठांमधील व्यापारी सहभागी झाले. दुपारनंतर व्यापाऱ्यांनी आपापल्या बाजारपेठांमध्ये एकत्रितरीत्या सरकारच्या धोरणाविरोधात निदर्शने केली. ‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, रिटेल व्यापारी आणि लघु उद्योगांना संजीवनी देण्यासाठी केंद्र सरकारने धोरण बदलावे. एनव्हीसीसीचे अध्यक्ष हेमंत गांधी म्हणाले, व्यापाऱ्यांच्या एकतेपुढे सरकारला नमावे लागेल. विदेशी गुंतवणुकीमुळे रिटेल व्यापाऱ्यांचे नुकसान होणार असून रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. 

पेट्रोल पंप दुपारी १२ ते ४ बंदभारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय विदर्भ पेट्रोलियम डीलर असोसिएशने घेतला होता. निर्णयानुसार शुक्रवारी नागपुरातील पंप दुपारी १२ ते ४ या वेळात बंद होते. वाहनचालकांच्या माहितीसाठी पंपावर आधीच बंदचे बोर्ड झळकत होते. पण बंदची माहिती नसल्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली. दुपारी ४ नंतर पंप सुरू झाल्यानंतर सर्वच पंपावर वाहनचालकांची गर्दी होती.

होलसेल क्लॉथ मार्केटमध्ये तणावभारत व्यापार बंद आंदोलनादरम्यान गांधीबाग येथील होलसेल क्लॉथ मार्केटमध्ये काही वेळ तणाव निर्माण झाला. या बाजारपेठेत पोहोचलेल्या नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांना गांधीबाग कापड संघटनेने बंदला समर्थन न दिल्यामुळे मार्केटमधील दुकाने बंद होणार नाहीत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. यावर दोन्ही गट हमरीतुमरीवर आले. या घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी हे प्रकरण शांत केले. त्यानंतर क्लॉथ मार्केटमधील दुकाने सुरू असल्याचे वृत्त होते. 

मॉ विदर्भ चंडिका मंदिरात महाआरतीभारत व्यापार बंद आंदोलनाची सुरुवात शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता शहीद चौकातील मॉ विदर्भ चंडिका मंदिरात महाआरतीने झाली. एनव्हीसीसीचे अध्यक्ष हेमंत गांधी आणि कॅटचे नागपूरचे अध्यक्ष किशोर धाराशिवकर यांनी महाआरती केली. यावेळी एफडीच्या विरोधात बंद यशस्वी करण्याचे व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात आले. 

कळमना बाजारात व्यवसाय ठप्प कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कळमना येथील पं. जवाहरलाल नेहरू मार्केट यार्डममध्ये भारत बंदचा परिणाम दिसून आला. शुक्रवारी धान्य बाजारात व्यवसाय ठप्प होता. पण फळे आणि भाजी बाजारात व्यापाऱ्यांची दुकाने खुली असल्याचे दिसून आले. अर्थात कळमन्यात संमिश्र प्रतिसाद दिसला. 

ग्राहक खरेदीविना परतलेभारत बंद आंदोलनाची माहिती ग्राहकांना नसल्यामुळे खरेदीसाठी आलेल्या अनेक ग्राहकांना खरेदीविना परतावे लागले. इतवारी आणि महाल येथील गारमेंटची दुकाने बंद होती. त्यामुळे ग्राहकांना खरेदी करता आली नाही. सीताबर्डी मुख्य बाजारपेठ, खामला, जरीपटका आणि बडकस चौकातील दुकाने पूर्णत: बंद होती. 

एनव्हीसीसीतर्फे व्यापाऱ्यांचे अभिनंदनचेंबरचे अध्यक्ष हेमंत गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली बंद यशस्वी करण्यासाठी चेंबरच्या एफडीआयविरोधी समितीचे संयोजक राजू माखिजा यांनी त्यांची चमू, चेंबरचे पदाधिकारी, माजी अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य, चेंबरशी संलग्न व्यापारी संघटनांचे अध्यक्ष, सचिव, व्यावसायिक प्रतिनिधी, सदस्य आणि व्यापाऱ्यांचे अभिनंदन केले. बंद यशस्वी करण्यासाठी चेंबरचे माजी अध्यक्ष गोविंदलाल सारडा, प्रकाश वाधवानी, प्रकाश मेहाडिया, उपाध्यक्ष अर्जुनदास आहुजा, अश्विन मेहाडिया, फारुखभाई अकबानी, सचिव संजय के. अग्रवाल, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, सहसचिव स्वप्निल अहिरकर, कार्यकारिणी सदस्य रमण पैगवार, प्रताप मोटवानी, मनोज लटुरिया, गजानंद गुप्ता, हरगोविंद मुरारका, संतोष कावडा, मनुभाई सोनी, शंकर सुगंध, प्रभाकर देशमुख, महेशकुमार कुकरेजा, राजेश ओहरी, राजेश पटेल, किशोर धाराशिवकर, अशोक आहुजा, राजेश काटकोरिया, राजेश मुनियार, हुसेनभाई अजानी, सलीम अजानी, गणेश चौरिया, दिनेश छाबडा, अशोक सोनी, अलीभाई निमचवाला, स्वप्निल वांद्रे, प्रदीप साठे, प्रवीण गुप्ता, मनोज शाहू, विजय दहीकर, संजय ताबुतवाला, पंकज पडिया, राजेश लखोटिया, सूर्यकांत अग्रवाल, योगेश बंग, जयंत बडवार, राजेश रोकडे, विक्रम आहुजा, ओंकारेश्वर, गौरव, पुरुषोत्तम कावळे, रामचंद्र येरपुडे, चंद्रकांत अरमरकर, विशाल पारेख, रविकांत हरडे, मुकेश पारेख, विजय धारीवाल, मंगेश डांगे, राजेश पटेल, योगेश बंग,अनिल सारडा, सुरेश सोमानी, संतोष शर्मा, ललित पटेल, अनिस खान, सुभाष अग्रवाल, विजय मेहाडिया, संदीप बावने, मनोज मिरपुरी, विजय अग्रवाल, विजय केवलरामानी आणि अनेक व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला.

कन्झुमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युशन असो.ची रॅलीबंदचे समर्थन करताना कन्झुमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युशन असोसिएशनने चेंबरच्या प्रांगणातून दुपारी ३ वाजता रॅली काढली. रॅलीत असोसिएशनचे अध्यक्ष पुनीत कुसुमगर, सचिव आनंद भुतडा, आयोजक सचिव सुभाष जोबनपुत्रा, सदस्य जॅकी फुलवानी, अशोक वियानी, दीपक कोठारी, संदीप अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते. 

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदnagpurनागपूर