बाजारपेठा बंद; पण हजारो माणसे रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:07 IST2021-04-07T04:07:38+5:302021-04-07T04:07:38+5:30
नागपूर : लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी शहरात जमावबंदीचा फज्जा उडालेला दिसला. मनपा आयुक्त आणि पालकमंत्र्यांच्या वेगवेगळ्या आदेशांमुळे उडालेल्या संभ्रावस्थेत व्यापारी ...

बाजारपेठा बंद; पण हजारो माणसे रस्त्यावर
नागपूर : लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी शहरात जमावबंदीचा फज्जा उडालेला दिसला. मनपा आयुक्त आणि पालकमंत्र्यांच्या वेगवेगळ्या आदेशांमुळे उडालेल्या संभ्रावस्थेत व्यापारी आणि दुकानदारांनी लॉकडाऊन पाळला. मात्र, या निर्णयाविरोधात सर्वत्र संताप दिसला. बाजारपेठा बंद असल्या तरी शासकीय कार्यालये आणि धान्य, किराणा दुकानांसह अन्य सेवा सुरू होत्या. यामुळे एकीकडे बाजारेपठा बंद असल्या तरी शहरातील रस्त्यांवर हजारो नागरिकांची गर्दी होती. व्यवसाय बंद पडल्याने व्यापारी मात्र गटागटाने जमून चर्चा आणि विरोध करताना दिसले.
जरीपटका ही शहरातील गजबजलेली बाजारपेठ आहे. मंगळवारी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी येथील सर्व दुकाने बंद होती. सकाळपासून व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली नाही. अनेकांना संभ्रम होता. मात्र, संपूर्ण शहरातच लॉकडाऊन पाळला जात असल्याने कामावरील कामगार, कर्मचारी येऊनही दुकाने बंद होती. सकाळी ११ वाजताच्या सुमारास कमाल चौकातही बाजारपेठा बंद होत्या. अनेक व्यापारी एकत्र येऊन संताप व्यक्त करीत होते. इंदोरा चौक परिसर, गोळीबार चौक परिसर आदी भागांतही दुकाने बंद होती. मात्र, शहरातील बहुतेक भागांमध्ये फेरीवाल्यांचा व्यवसाय सुरू होता.
सकाळी १०.३० वाजतानंतर काही दुकानदारांनी नेहमीप्रमाणे दुकाने उडघण्याचा प्रयत्न केला. फेब्रिकेशन वर्क, गॅरेज आदी सेवा देणाऱ्या दुकानदारांनी काही वेळासाठी दुकाने उघडून नंतर मात्र, स्वत:हून बंद केली. पोलिसांचा बंदोबस्त जरीपटका, कमाल चौक या परिसरात कुठेच दिसला नाही, ११.३० वाजताच्या दरम्यान जरीपटका परिसरात एकमेव पोलिसांचे वाहन गस्तीवर दिसले. व्यापारी लॉकडाऊनला सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
...
किराणा दुकानांमध्ये गर्दी
शहरातील धान्य आणि किराणा दुकानांमध्ये बरीच गर्दी दिसली. लॉकडाऊनबद्दल नागरिकांच्या मनात संभ्रम दिसला. शनिवारी आणि रविवारी दोन दिवस कडक लॉकडाऊन असल्याच्या धास्तीने अनेकांची खरेदीसाठी लगबग सुरू होती.
...