मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी मार्केटचे लोकार्पण

By Admin | Updated: February 7, 2016 02:57 IST2016-02-07T02:57:04+5:302016-02-07T02:57:04+5:30

केंद्र व राज्य सरकारच्या मत्स्य विभागाच्या सहकार्याने महापालिकेने मंगळवारी बाजार परिसरात उभारलेल्या ...

The market opens on Tuesday at the hands of Chief Minister | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी मार्केटचे लोकार्पण

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी मार्केटचे लोकार्पण

नागपूर : केंद्र व राज्य सरकारच्या मत्स्य विभागाच्या सहकार्याने महापालिकेने मंगळवारी बाजार परिसरात उभारलेल्या अत्याधुनिक मासोळी मार्केटचे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर देशमुख, प्रकाश गजभिये, गिरीश व्यास, सुधाकर कोहळे, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते. फडणवीस व गडकरी यांनी फित कापून मासोळी बाजाराचे लोकार्पण केल्यानंतर नवनिर्मित मार्केटची पाहणी केली. स्थापत्य समितीचे सभापती सुनील अग्रवाल, बसपाचे गटनेते गौतम पाटील, मुस्लीम लीगचे असलम खान, सभापती गिरीश देशमुख, राजू थूल, राज्य मत्स्य विकास महामंडळाचे संचालक युवराज फिरके, नागपूर विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक रामदास वासनिक, अप्पर आयुक्त आर.झेड.सिद्दीकी,, उपायुक्त संजय काकडे, मत्स्य सहकारी संस्थेचे प्रकाश लोणारे, आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर, सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम,कार्यकारी अभियंता दिलीप जामगडे, डी.डी. जांभूळकर आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: The market opens on Tuesday at the hands of Chief Minister