बाजार बंद, रस्त्यावरची वर्दळ कायम ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:07 IST2021-03-07T04:07:49+5:302021-03-07T04:07:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने पुन्हा शनिवार व रविवारी बंद पुकारला. गेल्या आठवड्याप्रमाणे यावेळीही नागरिकांकडून ...

Market closed, road congestion persists () | बाजार बंद, रस्त्यावरची वर्दळ कायम ()

बाजार बंद, रस्त्यावरची वर्दळ कायम ()

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने पुन्हा शनिवार व रविवारी बंद पुकारला. गेल्या आठवड्याप्रमाणे यावेळीही नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आली. दुसऱ्या आठवड्यातील बंदच्या पहिल्या दिवशी आज दुकाने, बाजार, प्रतिष्ठान, कार्यालये बंद होती. परंतु रस्त्यावर वाहने मात्र कायम होती. गेल्या आठवड्यापेक्षा वर्दळ वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे बंदला नागपूरकरांचा प्रतिसाद कायम असला तरी, तो या आठवड्यात संमिश्र राहिल्याचे दिसून आले.

गेल्या आठवड्यात बंदच्या दोन्ही दिवशी रस्त्यावरची वर्दळ नाममात्र होती. दुकान-बाजार पूर्णपणे बंद होते. दारूच्या दुकानांवर गर्दी होती. या आठवड्यात प्रशासनाने दारूची दुकाने पूर्णपणे बंद केली. मटन, चिकनची दुकाने मात्र सुरू ठेवण्यास परवानगी दिली. तसेच वाहन दुरुस्ती व वर्कशॉप सुरू होते. यासोबत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडली तर सर्वच बंद होते. आज शनिवारी बंद काटेकोरपणे पाळला गेला. मात्र रस्त्यावर लोकांची, वाहनांची वर्दळ गेल्या आठवड्यापेक्षा आज अधिक होती. नागरिकांवर प्रशासनाने कुठलीही सक्ती केलेली नाही. आपली जबाबदारी समजून हा बंद यशस्वी करायचा आहे. तेव्हा नागरिकांनी नागपुरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता, आपली जबाबदारी पार पाडण्याची गरज आहे.

बॉक्स

बाजारांमध्ये सामसूम

दुकान, बाजार, मॉल्स, सिनेमागृह, नाट्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट

आदी सर्वच बंद होते. सदर, गोकुळपेठ, सीताबडी, महाल, इतवारी, जरीपटका, कमाल चौक, मोमीनपुरा आदी नागपुरातील मुख्य बाजारपेठा बंद असल्याने येथे सामसूम होती.

-----------------

बॉक्स

दारू दुकाने बंद

गेल्या शनिवारी बंदच्या पहिल्या दिवशी दारूचे दुकान सुरू राहिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. यावेळी प्रशासनाने दारूची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नागपुरातील सर्व प्रकारच्या दारूची दुकाने व बार बंद होते. घरपोच सेवा सुरू होती.

Web Title: Market closed, road congestion persists ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.