विवाहितेची आत्महत्या, पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:07 IST2021-07-01T04:07:43+5:302021-07-01T04:07:43+5:30

नागपूर : विवाहितेला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या पतीसह चार कुटुंबीयांविरुद्ध सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ३ मे रोजी हिंदीबन ...

Marital suicide, crime against four including husband | विवाहितेची आत्महत्या, पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा

विवाहितेची आत्महत्या, पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा

नागपूर : विवाहितेला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या पतीसह चार कुटुंबीयांविरुद्ध सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ३ मे रोजी हिंदीबन येथील रहिवासी नसरीन मो.इरफान (३२) हिने फाशी घेतली. पोलिसांना तपासात नसरीनचा पती मो. इरफान, दीर अब्दुल आरिफ, मो. अजहर आणि नणंद तनवीर जब्बार यांनी शारीरिक व मानसिक शोषण करून, तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

..........

३ लाखांच्या दागिन्यांची चोरी

नागपूर : हिंगणाच्या पेठमध्ये एका घरातून रोख रकमेसह ३.३० लाखांच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली. मोरेश्वर डवरे २९ जूनला रात्री कुटुंबासह झोपले होते. दरवाजाची कुंडी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून २२ हजार रुपये रोख आणि दागिने पळविले. हिंगणा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

.......

Web Title: Marital suicide, crime against four including husband